- हुसेन मेमनजव्हार : युवकाचा खुन करुन त्याचे प्रेत बंधाऱ्यामध्ये पुरणाºया गुन्हेगारांना जव्हार पोलीसांनी तक्रारदाराने संशय व्यक्त केल्यानंतर अवघ्या ४८ तासात ताब्यात घेऊन न्यायालया पुढे उभे केले. तिघा गुन्हेगारांपैकी दोघे अल्पवयिन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधारगृहात करण्यात आली असून एकाला ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.नांदगाव येथील राजेवाडीमध्ये राहणाºया रवी चिंत्या गोंड (१८) हा हरवल्याची तक्रार तब्बल एकविस दिवसानंतर १६ नोव्हेंबर २०१८ रोजी चिंत्या गोंड यांनी जव्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, मांजरकडा डोंगराच्या उतारावर बांधलेल्या बंधाºयातून उग्र वास येऊ लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यात गाडलेले प्रेत ताब्यात घेतले. ते रवीचे असल्याचे कुटुंबियांनी सांगताच तपासाची चक्र फिरु लागली. या प्रकरणी ९ डिसेंबर रोजी काहींवर संशय व्यक्त करताच दुसºयाच दिवशीपोलिसांनी भिवंडी येथे जाऊन रवि जयराम वळीव (२१) व त्याचे दोन साथीदारांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्याचे पो.नि. डि. पी. भोये, सहा. पोलीस निरीक्षक राकेश पगारे, उपनिरीक्षक सुरवळकर पोलीस हवालदार दिवे, सानप यांच्या पथकाने तपासाची कार्यवाही पुर्ण केली.
धागेदोरे हाती लागताच खुनी झाले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 2:13 AM