नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या चिमुकलीच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये एका महिलेने आपल्या मुलीला उपचारासाठी दाखल केले आहे. याच दरम्यान महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले असून बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच तिची छेड काढली. पीडितेने मोठमोठ्याने आरडाओरडा करताच आरोपी पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पीडितेने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरच्या सर्कुलर रोडवरील एका खासगी रुग्णालयात महिलेच्या पाच वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना एक कर्मचारी लहान मुलीला चेक करायला आला आणि तिला किती ताप आहे हे पाहून निघून गेला. मात्र त्यानंतर तो पुन्हा एकदा रात्री परत आला. उपचार सुरू असलेल्या रुमचा दरवाजा बंद केला आणि त्यानंतर महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.
रुग्णालयातील कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार करण्याचा देखील प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पीडितेचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पण तरीही महिलेने त्याच्या तावडीतून आपली सुटका केली. पीडितेने सकाळी आपल्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार सर्वांना सांगितला. नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. घटना रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! फिरण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर मित्रासह 7 जणांचा सामूहिक बलात्कार; 4 जणांना अटक
झारखंडच्या रांचीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. फिरण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. 13 वर्षीय विद्यार्थिनीवर मित्रासह 7 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित मुलगी तिच्या मित्रासोबत फिरायला गेली होती. तिथे तिचा मित्र आणि इतर सहा जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. आणखी तीन जण फरार आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.