माझी सुंदर पत्नी मला सोडून गेली... पत्नीला माहेरून परत आणण्यासाठी घेतली पोलिसांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 20:31 IST2022-02-18T20:30:29+5:302022-02-18T20:31:04+5:30
Crime News : उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मातोंड गावातील रहिवासी असलेल्या नंदू पालचे लग्न गेल्या वर्षी 30 एप्रिल 2021 रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस स्टेशन क्षेत्रातील नागरौली गावातील रीना पाल यांच्याशी झाले होते.

माझी सुंदर पत्नी मला सोडून गेली... पत्नीला माहेरून परत आणण्यासाठी घेतली पोलिसांची मदत
मध्य प्रदेशातील छतरपूर पोलिस कार्यालयात एक व्यक्ती विचित्र तक्रार घेऊन पोहोचला. तो म्हणतो की, माझी पत्नी जास्त सुंदर आहे म्हणून माझ्यासोबत राहत नाही. तरुण म्हणाला, 'मी सासरच्या घरी गेलो तेव्हा बायकोने येण्यास नकार दिला आणि सासरच्या लोकांनी मला मारहाण केली, आता म्हणून मी एसपी ऑफिसमध्ये आलो आहे, कदाचित एसपी साहेब मला मदत करतील. '
खरं तर, उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मातोंड गावातील रहिवासी असलेल्या नंदू पालचे लग्न गेल्या वर्षी 30 एप्रिल 2021 रोजी छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस स्टेशन क्षेत्रातील नागरौली गावातील रीना पाल यांच्याशी झाले होते. नंदू पाल सांगतात की, माझी पत्नी सुंदर, हुशार आहे, ती सुशिक्षितही आहे, यामुळे तिला पतीसोबत राहायचे नाही.
नंदू पाल सांगतात की, जेव्हा मी माझ्या पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरच्या घरी गेलो होतो, तेव्हा तिने येण्यास नकार दिला. तसेच घरच्यांनी मारहाण केली, मला माझी पत्नी परत हवी आहे, ज्यांनी मला मारहाण केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे, लग्नानंतर तीन दिवसांनी ती तिच्या माहेरी गेली, आता मी पोलिस ठाण्यात जात आहे.
या प्रकरणी छत्तरपूरचे एसपी सचिन शर्मा यांच्याशी बोलणे झाले, त्यांनी फोनवर माहिती देताना सांगितले की, होय, हा प्रकार कार्यालयात आला आहे, परंतु ते प्रकरण अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही, मी त्याची चौकशी करतो.