सातारा: माझा मुलगा पोलीस आहे. कायदा काय असतो ते तुला दाखवतो, असे म्हणत वयोवृद्धाला मारहाण केल्याची घटना जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ येथे दि. १७ रोजी घडली. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विजय आनंदराव मोहिते, अमित विजय मोहिते (दोघेही रा. खर्शी तर्फ कुडाळ, ता. जावळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खर्शी येथील सुजित शिवणकर (वय ३३) याचे वडील सुरेश शिवणकर हे उसाच्या पिकाला तोड येणार असल्याने शेतात गेले होते. त्यावेळी शेताच्या लगत विजय मोहिते आणि अमित मोहिते हे उसाच्या शेतात पाटाचे पाणी सोडत असताना त्यांना दिसले. त्यावेळी सुरेश शिवणकर यांनी त्यांना समक्ष बोलावून उद्या उसाला तोड येणार आहे.
खळबळ! प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर दररोज घरी यायचा, रागाने वडिलांनी जिवंत जाळले
तू आमच्या शेतात पाणी सोडून का नुकसान करतोय, असे विचारले याचा राग मनात धरून दोघांनी हातातील खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने शिवणकर यांच्या पायावर मारले. त्यानंतर माझा मुलगा पोलीस आहे. कायदा काय असतो ते तुला दाखवतो आणि तुझा ऊस कसा जातो ते बघतोच, अशी धमकी देत शिवणकर यांना लाकडी दांडके, लोखंडी खोऱ्याच्या दांडक्याने डाव्या पायावर मारहाण केली. या प्रकारानंतर सुरेश शिवणकर यांचा मुलगा सुजित शिवणकर याने मेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.