'माझ्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे जबाबदार...', व्हिडिओ पोस्ट करून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 09:44 PM2022-04-25T21:44:51+5:302022-04-25T21:45:15+5:30
Suicide Case : व्हिडिओमध्ये तिघांचीही नावे घेतली आहेत. त्यानंतर त्याने विष प्राशन केले.
मध्य प्रदेशातील विदिशा येथे एका व्यक्तीने विष पिऊन आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण शमशाबाद पोलीस ठाण्यांतर्गत मेळा मैदान परिसरातील आहे. भगवानदास धाकड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विष पिण्यापूर्वी त्या व्यक्तीने आपल्या मृत्यूस पत्नी, सासू, सासऱ्याला जबाबदार धरले. तसेच त्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने पत्नी, सासू आणि सासरे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला होता. व्हिडीओमध्ये तो त्याच्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे हे जबाबदार असल्याचे सांगताना दिसत आहे. त्याने व्हिडिओमध्ये तिघांचीही नावे घेतली आहेत. त्यानंतर त्याने विष प्राशन केले.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. विष प्राशन केल्यानंतर पोलिसांनी तातडीने भगवानदास धाकड यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना विदिशा रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदिशाच्या पोलीस अधीक्षक मोनिका शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, शमशाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत एका व्यक्तीने ३ दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्याला तात्काळ विदिशा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत.