मुझफ्फरनगर - 'दृश्यम' हा चित्रपट पाहून त्याच्या मनात असं भयंकर कारस्थान शिजलं की तो आपल्याच मित्राचा खुनी झाला आणि मग त्याच मित्राच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत राहिला. चार वर्षे तो त्याच्या मृतदेहावर झोपला, त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी घरी जात राहिला. ज्या मित्राला त्याने चार वर्षांपूर्वी मारलं होतं. लोकांसमोर तो त्याच्या परत येण्याची वाट पाहायचा. परंतु मृत्यूनंतर कोणीही परत येत नाही हे त्याला माहित होतं, मात्र मृतकाच्या वडिलांसमोर तो म्हणायचा की तुमचा मुलगा नक्की परत येईल.
४ वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाची कहाणीही कहाणी आहे मित्राच्या विश्वासघाताची, ही कहाणी आहे एका अत्यंत भीषण हत्येची, ही कहाणी आहे मारेकऱ्याच्या क्रूर प्लॅनिंगची. दृश्यम' चित्रपटात अजय देवगणने खून केला तेव्हा पोलिसांना त्याच्यावर संशय येत होता, पण मुझफ्फरनगरमधील या खऱ्या घटनेत खुनी इतका धूर्त होता की त्याच्यावर क्षणभरही कुणाला संशय आला नाही. सुमारे ४ वर्षांपूर्वी, २५ नोव्हेंबर २०१८ रोजी, मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर गावात त्या संध्याकाळी दृश्यमच्या दृश्याची पुनरावृत्ती झाली. मोहम्मद हसन आणि सलमान हे दोन मित्र एकत्र बसले होते. दोघेही मजा-मस्ती करत होते, मात्र अचानक कुठल्यातरी मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सलमानला इतका राग आला की त्याने घरात ठेवलेल्या तलवारीने मोहम्मद हसनवर हल्ला करून त्याची हत्या केली.
मृतदेह जमिनीखाली गाडलासलमानसमोर त्याच्याच मित्राचा मृतदेह पडला होता. तेव्हा दृश्यम चित्रपटातील दृश्य त्याच्या मनात आले मग त्याने आपल्या घरात खोल खड्डा खणला. सलमानने मोहम्मद हसनचा मृतदेह या खड्ड्यात पुरला आणि वर माती टाकली. रोज त्याच मृतदेहावर खाट ठेवून सलमान झोपत होता. काही दिवसांनी त्याने घरातील काम करून तेथे काँक्रीटचा फरशी बनवली. मोहम्मद हसनचा मृतदेह त्या जमिनीखाली पुरला होता. सलमानवर कोणी संशयही घेतला नाही.
'तो नक्की परत येईल'दुसरीकडे, मोहम्मद हसनचं कुटुंब मुलगा अचानक कुठे गायब झाला या चिंतेत होते. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र मोहम्मद हसन कुठेच सापडला नाही. सलमान मोहम्मद हसनच्या घरी येत जात असे. तो अनेकदा मोहम्मद हसनच्या घरी जायचा, आई-वडिलांच्या दु:खाने दु:खी व्हायचा, त्यांना सांगायचा, एक दिवस तो नक्की येईल. आपल्या मुलाच्या मित्राला पाहून कुटुंबीयांनाही आनंद होत होता. त्यांना आशा होती की कधीतरी आपला मुलगा परत येईल, परंतु आपल्या मुलाचा खून करणारा आपल्या समोर आहे हे सत्य त्यांना माहिती नव्हते. अशातच दिवस गेले, महिने सरले, वर्षे गेली, पण मोहम्मद हसन परत आला नाही.
खुन्यानेच गुपिते उघड केलंदोन दिवसांपूर्वी म्हणजे शनिवारी गावात एकाचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण गाव स्मशानात गेले. मोहम्मद हसनचा भाऊ सलीम आणि सलमानही तिथे उपस्थित होता. त्यांच्या संभाषणात मोहम्मद हसनबद्दल चर्चा सुरू होती त्यात बोलण्याच्या नादात सलमानच्या तोंडून ४ वर्षापूर्वी केलेले गुपित बाहेर पडलं. त्या दिवशी खुन्यानेच ते रहस्य उघड केले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. मोहम्मद हसन पुन्हा कधीच येणार नाही, असे अचानक सलमानच्या तोंडून निघाले, कारण चार वर्षांपूर्वी त्याने त्याला ठार मारले होते. सलमानच्या तोंडून हे शब्द गेले पण त्यानंतर आपण काय केले हे समजल्यावर त्याचे भान हरपले.
४ वर्षांनंतर सत्य बाहेर आलेमोहम्मद हसनच्या भावाला हे कळताच त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. आता चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा गुन्हेगार समोर होता, पण हत्येनंतर चार वर्षे तो मोहम्मदच्या मृतदेहावर झोपला असेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पोलिसांच्या चौकशीत हा सगळा प्रकार उघडकीस आला. स्वतःच्याच मित्राची हत्या करून त्याचा मृतदेह त्याच्याच खोलीच्या फरशीवर कसा पुरला हे सलमानने स्वतः सांगितले.
जमिनीखाली सांगाडा सापडलासलमानच्या घरात पोलिसांनी खड्डा खणला. सुमारे ५ तास खोदकाम सुरू होते. पाच फूट खोल खड्डा खणण्यात आला. त्यानंतर जमिनीत गाडलेले सत्य बाहेर आले. पाच-सहा फूट खोलवर गेल्यानंतर मोहम्मद हसनचा सांगाडा सापडला. संपूर्ण गाव हादरले होते, मोहम्मद हसनचे कुटुंबीय रडत होते. ज्याला ते आपल्या मुलाचा मित्र मानत होते तोच मुलाचा खुनी निघेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.
आरोपीला अटकमोहम्मद हसन यांच्या पश्चात आई-वडील, तीन भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गेल्या चार वर्षांपासून मोहम्मद हसन गायब झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब दु:खी होते, पण तरीही तो नक्कीच परत येईल अशी आशा होती. आता दोन दिवसांपासून आपल्या मुलाचा सांगाडा पाहून या कुटुंबाला धक्का बसला आहे. आता तो कधीच परत येणार नाही हे त्यांना कळून चुकले. खून आणि त्यानंतर अशी भयानक प्लॅनिंग करणाऱ्या सलमानला पोलिसांनी अटक केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"