सातारा : शहरालगत असणाऱ्या खिंडवाडीतील जंगलामध्ये आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले असून, केवळ दोन तासांतच सातारा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. संबंधित युवकाचा खून झाला असून, हा खून आईच्या सांगण्यावरून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी, खिंडवाडीतील जंगलामध्ये बुधवारी दुपारी एका युवकाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. या युवकाच्या डोक्याजवळ दगड आणि रक्त दिसून आले. त्यामुळे त्याचा खून झाला असावा, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. प्रकाश कदम (वय ३०, रा. वळसे, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी केवळ दोन तासांत संशयित आरोपी साहिल मुलाणी आणि प्रमोद साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) या दोघांनाही अटक केली. या दोघांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चक्रावून टाकणारी माहिती पोलिसांना दिली. प्रकाश कदम हा दारू पिऊन वारंवार त्याच्या आईला त्रास देत होता. काही वर्षे तो मुंबईमध्ये काम करत होता. मात्र, गावी आल्यानंतर तो परत जात नसे. गावी काहीही काम न करत तो दारू पिऊन आईला शिवीगाळ करत होता. या त्रासाला त्याची आई कंटाळली होती. त्यामुळे आईने नात्यातील प्रमोद साळुंखे याला त्याचा कायमचा काटा काढण्याचे सांगितले. त्यानुसार प्रमोदने त्याचा मित्र साहिल याला सोबत घेतले. २६ आॅगस्ट रोजी दुपारी तिघेजण दारू पिण्यासाठी खिंडवाडीतील जंगलामध्ये गेले. या ठिकाणी प्रकाशला दारू पाजल्यानंतर दोघांनी प्रकाशचा गळा चिरला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा निघृर्ण खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुजित भोसले, दादा परिहार, सागर निकम, नितीनराज थोरात, सतीश पवार, संदीप कुंभार यांनी केली.आई सुद्धा ताब्यातमुलाच्या खुनाची सुपारी देणाऱ्या आईलाही पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. तिच्याकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू होती. या प्रकरणातील आणखी वस्तूस्थिती गुरुवारी दुपारपर्यंत समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक
आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा