लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद नगरातील रहिवासी आहे. पीडित व्यक्तीचे नाव अतुल नारायण गुजर (वय ५४) असून ते बजाजनगरात राहतात. आरोपी मसराम याने गुजर यांना २०१६ मध्ये प्रोटीन पुरविण्याचे सरकारी कंत्राट मिळवून देतो, त्यातून तुम्हाला लाखोंचा फायदा होईल, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून गुजर यांनी त्याला हे कंत्राट मिळवून देण्याची विनंती केली. त्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाखाली आरोपी मसराम याने गुजर यांच्याकडून १७ आॅक्टोबर २०१६ ते २ आॅगस्ट २०१९ या कालावधीत २२ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र गुजर यांना कोणतेही कंत्राट मिळवून दिले नाही. आपली रक्कम परत मागितली असता त्याने गुजर यांची रक्कमही परत केली नाही. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे गुजर यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी मसरामविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी सुरू आहे.
नागपुरात सरकारी कंत्राटाचे आमिष दाखवून २२ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 9:23 PM
सरकारी कंत्राट मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका आरोपीने २२ लाख ५० हजार रुपये हडपले. राजू श्यामराव मसराम असे आरोपीचे नाव असून तो वर्धा येथील हिंद नगरातील रहिवासी आहे.
ठळक मुद्देबजाजनगरात गुन्हा दाखल : चौकशी सुरू