लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होम शॉपीत गिफ्ट कूपन लागल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका गृहिणीची २.५९ लाखाने फसवणूक केली. पतीला घटनेची माहिती दिल्यानंतर गृहिणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले.वाठोडा पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रणयप्रभा दुरुगकर (५३) रा. सेनापतीनगर या २३ जानेवारी २०१९ रोजी आपल्या घरी होत्या. त्यांना मोना सिंह नावाच्या युवतीने मोबाईलवर संपर्क केला. मोनाने आपण होम शॉपीतून बोलत असल्याचे सांगितले. तिने प्रणयप्रभा यांना होम शॉपीने १२.८० लाखाचे गिफ्ट कूपन लागल्याची माहिती दिली. गिफ्ट कूपन मिळविण्यासाठी प्रणयप्रभाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात लॉकर उघडण्याची माहिती दिली. लॉकर उघडण्यासाठी तिने प्रणयप्रभा यांना पैसे जमा करण्यास सांगितले. प्रणयप्रभा यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले. त्यांनी अल्पावधीत २.५९ लाख रुपये गमावले. त्यानंतरही गिफ्ट कूपन पाठविण्याऐवजी पैशांची मागणी सुरू होती. प्रणयप्रभा यांनी आपल्या पतीला ही बाब सांगितली. पतीने त्यांना फसवणुक झाल्याची माहिती दिली. त्यांनी वाठोडा ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दिल्लीतील आरोपी असल्याचा संशय आहे.
नागपुरात गिफ्ट कूपनच्या नावाखाली २.५९ लाख गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:15 AM
होम शॉपीत गिफ्ट कूपन लागल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका गृहिणीची २.५९ लाखाने फसवणूक केली. पतीला घटनेची माहिती दिल्यानंतर गृहिणीला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
ठळक मुद्देगृहिणीची फसवणूक