शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

नागपुरात तरुणावर चाकूहल्ला करून रक्कम लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 8:18 PM

तीन अनोळखी आरोपींनी चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्यानंतर त्याच्याजवळचे २५०० रुपये हिसकावून नेले. धंतोली पोलीस ठाण्याच्या मागच्या भागातील नागनदीच्या पुलाखाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

ठळक मुद्देनागनदी पुलाजवळ घटना : धंतोलीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन अनोळखी आरोपींनी चाकूहल्ला करून एका तरुणाला गंभीर जखमी केल्यानंतर त्याच्याजवळचे २५०० रुपये हिसकावून नेले. धंतोली पोलीस ठाण्याच्या मागच्या भागातील नागनदीच्या पुलाखाली शुक्रवारी रात्री ही घटना घडली.सागर शैलेश खोब्रागडे (वय १९) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो रामबाग, इमामवाड्यात राहतो. तो कॉटन मार्केट परिसरात मजुरी करतो. सायंकाळी काम आटोपल्यानंतर सागर त्याच्या व्हेरायटी चौकातील मित्राकडे गेला. त्याच्याकडून अडीच हजार रुपये उधार घेतल्यानंतर सागर यशवंत स्टेडियमजवळून नागनदीच्या पुलाखालून रामबागमध्ये जात होता. पुलाखाली अंधारात पोहचला असताना त्याच्यामागून मोटरसायकलवर तीन आरोपी आले. त्यांनी सागरला मारहाण करून त्याच्याजवळची रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न केला. सागरने तीव्र प्रतिकार केला. तो विरोध करीत असल्यामुळे आरोपींनी चाकूने त्याच्या छातीवर, मानेवर वार करून सागरजवळचे अडीच हजार रुपये हिसकावून घेतले. जखमी सागरने रस्त्याने येणाऱ्यांची मदत घेऊन धंतोली पोलिसांना कळविले. सहायक निरीक्षक देवाजी नरोटे यांनी त्याला ईस्पितळात पोहचवल्यानंतर त्याच्या बयाणावरून लूटमारीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींची शोधाशोध सुरू केली. मात्र, शनिवारी दुपारपर्यंत आरोपींबाबत पोलिसांना कसलीही माहिती कळली नाही.नेहमीच घडतात घटनारात्रीच्या वेळी नमूद भागात गर्दुले, चरसी, दारुडे, गुन्हेगार यांचा ठिय्या असतो. व्यसन भागविण्यासाठी जमलेली ही मंडळी त्या भागात नेहमीच गोंधळही घालतात. या भागात लूटमारीच्याही घटना नेहमीच घडतात. तरीदेखील या भागात पाहिजे तसा पोलीस बंदोबस्त अथवा गस्त राहत नाही. सीसीटीव्हीदेखील नाही. त्यामुळे बहुतांश गुन्ह्यांत आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी