नागपूर – महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील एका हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे, एका पत्नीने आपल्या पतीची गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. ही महिला मृत व्यक्तीची पाचवी पत्नी होती, या पत्नीने आधी नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवला, त्यानंतर त्याचे हातपाय खुर्चीला बांधले आणि शारिरीक संबंध बनवल्यानंतर त्याचा गळा कापून हत्या केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपूरात घडलेल्या या घटनेचा उलगडा पोलिसांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती लक्ष्मण मलिक नागपूरच्या सिल्वर कॉम्पलेक्स सोसायटीत एकटेच राहायला होते, घटनेच्या दिवशी ८ मार्च ला त्यांची पाचवी बायको स्वाती त्यांना भेटण्यासाठी आली होती. त्यानंतर स्वातीने लक्ष्मणसोबत शारिरीक संबंध करून त्याची हत्या केली, आपल्या नवऱ्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत हे समजल्यापासून स्वाती दु:खी होती, त्यामुळे तिने नवऱ्याची हत्या केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे या महिलेने तिचा गुन्हा मान्य केला आहे, ती मृत व्यक्तीची पाचवी पत्नी होती, या महिलेला अटक करण्यात आली आहे, नवऱ्याचे महिलांसोबत असलेल्या संबंधामुळे पत्नी नाराज होती, गेल्या अनेक महिन्यापासून दोघांमध्ये वाद होते, म्हणून ते वेगवेगळे राहत होते.
काय आहे प्रकरण?
हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीच्या एका ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मण रामलाल मलिक (वय अंदाजे ६५) नामक वृद्धाची गळा चिरून अज्ञात आरोपीने निर्घृण हत्या केली होती. मंगळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळ रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. मलिक तेथे काम करीत होता. मलिक मूळचा जरीपटका येथील रहिवासी असून, नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यानंतर मलिक तेथे थांबला. मंगळवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास ऑफिस उघडायला कर्मचारी आले तेव्हा खुर्चीत बसलेल्या अवस्थेत मलिक रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्याचे हात मागे बांधून होते आणि गळ्यावर कैची किंवा पेचकससारख्या शस्त्राचे वार केल्याच्या खुणा होत्या. खाली रक्ताचे थारोळे साचले होते. कर्मचाऱ्यांनी ही माहिती गणेशपेठ पोलिसांना कळविली. गणेशपेठ पोलिसांचा ताफा तसेच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. ठसेतज्ज्ञ आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. त्यानंतर २ दिवसात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.