आश्रमात नग्न परेड, महिलांना उघड्यावर आंघोळ करण्यास पाडले भाग; ८० महिलांवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:56 PM2022-04-22T19:56:00+5:302022-04-22T19:56:49+5:30
Naked parade in the ashram :२० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर प्रकरणावर संताप व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीतील रोहिणी परिसरात असलेल्या बाबा वीरेंद्र देव दीक्षित यांच्या 'अध्यात्मिक विश्व विद्यालया'मध्ये कुंटणखान्यापेक्षा वाईट वागणूक मुली आणि महिलांना दिली जात होती. मोठ-मोठ्या दरवाज्यांबाहेर त्यांचा आरडाओरडा, किंचाळ्या देखील ऐकू येत नव्हता. अल्पवयीन मुली, युवती आणि निराधार महिलांना चांगल्या व्यवस्थेचे आमिष दाखवून आश्रमात आणले जात होते. काही दिवसांनी त्यांच्यासोबत छेडछाड सुरू झाली. २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानेदिल्लीतील गंभीर प्रकरणावर संताप व्यक्त केले आहे.
उघड्यावर आंघोळ करावी लागली
कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातील महिलांना प्राण्यांपेक्षाही वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले होते. इथून बाहेर जाण्याचा विचारही कोणी करत नव्हता. चोवीस तास कडक बंदोबस्त होता. कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला एवढी मारहाण केली जाई की तो हतबल होत असे. महिलांना पडद्याशिवाय उघड्यावर आंघोळ करावी लागत होती. अशा अवस्थेत मुलींची परेडही केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये ही बाब उघड झाली होती. येथून सुमारे 40 महिलांची नरकयातनेतून सुटका करण्यात आली.
दिल्ली उच्च न्यायालयाने आश्चर्य आणि संताप व्यक्त केले
याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनेका गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, पीडितेच्या पालकांना तिला भेटायचे आहे. मात्र आश्रमातील लोकांनी हे होऊ दिले नाही. अधिवक्ता गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, या आश्रमाचा मुख्य आरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा आरोपी आहे, ज्यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपीविरुद्ध 10 खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.
गुपित उघड होताच आरोपी बाबा फरार झाला होता
आरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा ब्रह्मकुमारी संस्थानशी संबंधित होता. या संस्थेकडून आश्रमाच्या कारभाराची माहिती घेतल्यानंतर अध्यात्म विद्यापीठ नावाने स्वतःची संस्था स्थापन केली होती. या कथित बाबाने दिल्लीतील रोहिणी भागात आपला भव्य आश्रम बांधला, जिथे 100 हून अधिक महिलांना डांबून त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांचा वापर केला गेला. महिलांना वाटेल तेव्हा त्यांच्यावर बलात्कार झाला. कथित बाबाची पोल डिसेंबर 2018 मध्ये उघड झाली होती, एका तक्रारीत दिल्ली पोलिसांनी आश्रम परिसरातून 40 महिलांना त्यांच्या संरक्षणाखाली ताब्यात घेतले होते. याआधीही आरोपी वीरेंद्र देव दीक्षित फरार झाला होता. या आश्रमात आश्रय घेतलेल्या मुलीच्या पालकांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.