शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आश्रमात नग्न परेड, महिलांना उघड्यावर आंघोळ करण्यास पाडले भाग; ८० महिलांवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 7:56 PM

Naked parade in the ashram :२० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर प्रकरणावर संताप व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीतील रोहिणी परिसरात असलेल्या बाबा वीरेंद्र देव दीक्षित यांच्या 'अध्यात्मिक विश्व विद्यालया'मध्ये कुंटणखान्यापेक्षा वाईट वागणूक मुली आणि महिलांना दिली जात होती.  मोठ-मोठ्या दरवाज्यांबाहेर त्यांचा आरडाओरडा, किंचाळ्या देखील ऐकू येत नव्हता. अल्पवयीन मुली, युवती आणि निराधार महिलांना चांगल्या व्यवस्थेचे आमिष दाखवून आश्रमात आणले जात होते. काही दिवसांनी त्यांच्यासोबत छेडछाड सुरू झाली. २० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानेदिल्लीतील गंभीर प्रकरणावर संताप व्यक्त केले आहे.उघड्यावर आंघोळ करावी लागलीकोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आश्रमातील महिलांना प्राण्यांपेक्षाही वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले होते. इथून बाहेर जाण्याचा विचारही कोणी करत नव्हता. चोवीस तास कडक बंदोबस्त होता. कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तरी त्याला एवढी मारहाण केली जाई की तो हतबल होत असे. महिलांना पडद्याशिवाय उघड्यावर आंघोळ करावी लागत होती. अशा अवस्थेत मुलींची परेडही केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये ही बाब उघड झाली होती. येथून सुमारे 40 महिलांची नरकयातनेतून सुटका करण्यात आली.दिल्ली उच्च न्यायालयाने आश्चर्य आणि संताप व्यक्त केलेयाचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनेका गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, पीडितेच्या पालकांना तिला भेटायचे आहे. मात्र आश्रमातील लोकांनी हे होऊ दिले नाही. अधिवक्ता गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, या आश्रमाचा मुख्य आरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा आरोपी आहे, ज्यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपीविरुद्ध 10 खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

गुपित उघड होताच आरोपी बाबा फरार झाला होताआरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा ब्रह्मकुमारी संस्थानशी संबंधित होता. या संस्थेकडून आश्रमाच्या कारभाराची माहिती घेतल्यानंतर अध्यात्म विद्यापीठ नावाने स्वतःची संस्था स्थापन केली होती. या कथित बाबाने दिल्लीतील रोहिणी भागात आपला भव्य आश्रम बांधला, जिथे 100 हून अधिक महिलांना डांबून त्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांचा वापर केला गेला. महिलांना वाटेल तेव्हा त्यांच्यावर बलात्कार झाला. कथित बाबाची पोल डिसेंबर 2018 मध्ये उघड झाली होती, एका तक्रारीत दिल्ली पोलिसांनी आश्रम परिसरातून 40 महिलांना त्यांच्या संरक्षणाखाली ताब्यात घेतले होते. याआधीही आरोपी वीरेंद्र देव दीक्षित फरार झाला होता. या आश्रमात आश्रय घेतलेल्या मुलीच्या पालकांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटकsexual harassmentलैंगिक छळ