मुंबई - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आज विशेष सत्र न्यायालयात १२ आरोपींविरोधात ६ हजार 842 पानांचे आरोपी दाखल केले आहे.
नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा प्राप्त झाल्याने आणि बेकायदेशीर कृत्य तरतुदीनुसार राज्य शासन तसेच बेकायदा शस्त्र कायद्याच्या तरतुदीनुसार पालघर आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी घेऊन आरोपी शरद कळसकर (वय २५), वैभव राऊत ( वय ४४), सुधन्वा गोंधळेकर (वय ३९), श्रीकांत पांगारकर (वय ४०), अविनाश पवार (वय ३०), लीलाधर लोधी (वय ३२), वासुदेव सूर्यवंशी (वय १९), सुजीथ कुमार (३७), भारत कुरणे (वय ३७), अमोल काळे ( वय ३४), अमित बड्डी (वय २७), गणेश मिस्कीन (वय २८) यांच्याविरोधात स्फोटक पदार्थांचा कायदा १९०८च्या कलम ४,५ सह स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ - ब, बेकायदेशीररीत्या कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ च्या कलम १६, १८, १८ - अ, १८-ब, १९, २०, २३, भा. दं. वि. कलम २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदा शस्त्र कायदा १९५९ कलम ३, ५, ७, २५, २७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार आरोपपत्र एनआयए कायद्यान्वये स्थापित विशेष सत्र न्यायधीश यांच्या न्यायालयात आज सादर करण्यात आले.