शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

नाळवंडीतील रबरी शिक्का हजेरी प्रकरण: अडीच वर्षांपासून पडलेली फाईल पुन्हा उघडली

By सोमनाथ खताळ | Published: September 21, 2022 6:04 PM

'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस, आरोग्य विभागाच्या कारवाईच्या हालचाली सुरू

सोमनाथ खताळ, बीड: रबरी शिक्का लावून हजेरी लावल्याचा प्रकार नाळवंडी आरोग्य केंद्रात घडला होता. ही फाईल अडीच वर्षांपासून दडपली होती. परंतू टाकरवण केंद्रातील प्रकारानंतर याला पुन्हा वाचा फुटली. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच पोलीस व आरोग्य विभागाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. फाईलवरील धुळ झटकून ती पुन्हा उघडली आहे. याच प्रकरणात सीईओंनी बीड शहर पोलिसांना पत्र पाठवून रबरी शिक्क्यांचा तपास लावण्याबाबत सांगितले होते. परंतु हे पत्रच त्यांच्यापर्यंत पोहोचले नसल्याचे बुधवारी समोर आले आहे. यावरून अधिकाऱ्यांनी हे पत्र दडपल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड तालुक्यातील नाळवंडी आरोग्य केंद्रात ४ फेब्रुवारी २०१९ रोजी डॉ.सोनाली सानप, डॉ.बबन जाधव, आरोग्य सहायक रामचंद्र बहीर यांनी शिपाई आत्माराम यादव यांच्यामार्फत रबरी शिक्के लावून हजेरी लावल्याचे समोर आले होते. माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांनी कायाकल्प अंतर्गत भेट दिल्यावर हा प्रकार चव्हाट्यावर आला होता. याचा अहवाल त्यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. तत्कालीन सीईओ अमोल येडगे यांनी सुनावणी घेतली असता या सर्वांनी रबरी शिक्के लावून हजेरी लावल्याचे कबुल केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सीईओंनी १६ मे रोजी २०१९ रोजी उपसंचालकांना पत्र दिले. सोबतच बीड शहर पोलिसांनाही पत्र पाठवून रबरी शिक्क्यांचा तपास लावण्यास सांगितले होते. परंतू येडगे यांची बदली झाली आणि हे प्रकरण थंड झाले. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष करत हे पत्र केवळ आवक जावक ला नोंदवून घेत पुढे कोणालाच पाठविले नाही. त्यामुळे या डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर कसलीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जसा पोलिसांचा अर्ज दडपला तसाच उपसंचालकांना पाठविलेला अर्जही दडपल्याची शक्यता आहे. त्यामुळेच आतापर्यंत कारवाई झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

डॉक्टरांसह पत्र दडपणारेही गोत्यात

अगोदरच रबरी शिक्के लावून हजेरी लावत आरोग्य विभागाची फसवणूक करण्यात आली. यातील दोषींवर ४२० कलमांतर्गंत फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर हे पत्र दडपून त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही यात सह आरोपी म्हणून सहभाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रबरी शिक्के लावणाऱ्यांसोबत आता पत्र दडपणारेही गोत्यात आले आहेत.

रबरी शिक्का संदर्भात जि.प.सीईओ अथवा आरोग्य विभाग यांचे पत्र आम्हाला मिळालेले नाही. आम्ही सर्व रेकॉर्ड तपासले आहे.

-रवि सानप, पोलीस निरीक्षक, शहर ठाणे बीड

--

या फाईलची माहिती घेतली आहे. उपसंचालकांना याबाबत पत्र पाठवून स्मरण करून दिले जाईल. तसेच पोलिसांनाही आगोदरच्या पत्राचा रेफरन्स टाकून आणखी पत्र पाठविले जाईल. 

-डॉ. अमोल गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड 

--

रबरी शिक्का प्रकरणातील कारवाईबाबत पत्र आले की नाही, याची तपासणी करण्यास सांगितले आहे. लवकरच आपणाला कळविले जाईल. असा प्रकार असेल तर गंभीर असून निश्चीतच कारवाई केली जाईल.

-डॉ. कमल चामले, उपसंचालक लातूर

---

दरम्यान, याबाबत नाळवंडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली सानप यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या बिझी होत्या. तर तेव्हाचे नाळवंडीचे आणि आताचे साक्षाळपिंपरी येथे कार्यरत असलेले डॉ.बबन जाधव म्हणाले, याबाबत तुम्हाला डीएचओ ऑफिसलाच माहिती मिळेल. मला काही आठवत नाही.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी