एनआयए विशेष न्यायालयाने तीन लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना Nanded LET प्रकरणात दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) २०१२ मध्ये नांदेड येथून पाच जणांना अटक केली होती. नंतर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी हिंदू नेत्यांना व पत्रकारांना ठार मारण्याच्या कट रचल्याप्रकरणी २०१२ मध्ये अटक झालेल्या तीन जणांना मंगळवारी येथील विशेष एनआयए कोर्टाने तीन जणांना शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. ई. कोथळीकर यांनी अन्य दोन आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.
कोर्टाने मंगळवारी मोहम्मद अकरम, मोहम्मद मुजम्मिल आणि मोहम्मद सदिक यांना यूएपीए कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले.एनआयएनुसार अकरम रोजगाराच्या बहाण्याने सौदी अरेबियाला गेला आणि तेथे वास्तव्याच्या वेळी त्याची ओळख पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या विविध सदस्यांशी झाली.सौदीची राजधानी रियाद येथे नांदेड, हैदराबाद आणि बेंगळुरूसह भारतातील विविध भागांतील प्रमुख हिंदू नेते, पत्रकार आणि पोलिस अधिकाऱ्यांची हत्या घडविण्याच्या उद्देशाने अकरमने आपल्या हँड्लरसह कट रचला होता, अशी माहिती एनआयएने दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली, असे एजन्सीने कोर्टाला सांगितले.