कोलकाता - पश्चिम बंगालमधील नारदा स्टिंग ऑपरेशनप्रकरणी सीबीआयने आयपीएस अधिकारी सय्यद मोहम्मद हुसेन मिर्झा यांना अटक केली आहे. आता सीबीआयने त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं तेव्हा हुसेन मिर्झा त्यावेळी वर्द्धमान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरणी करण्यात आलेली ही पहिली अटक आहे. या प्रकरणात काही तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचीही नावे आहेत. स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना ते कैद झाले होते. २०१६ मध्ये पश्चिम बंगाल निवडणुकीआधी हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका कथित उद्योजकाला फायदा मिळवण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आयपीएस अधिकारी पैसे घेताना दाखवण्यात आलं होतं. या स्टिंग ऑपरेशनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.सीबीआयने नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणात पहिली अटक करत आयपीएस अधिकाऱ्याला गुरुवारी ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्य असूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणी करून मिर्जा यांना विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं असून कोर्टाने ३० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. नारदा समाचार पोर्टल आणि मॅथ्यू सॅम्युअलने जेव्हा हे स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळी मिर्जा पश्चिम बंगालमधील वर्द्धमान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. यापूर्वी देखील मिर्जा यांची चौकशी करण्यात आली होती.
नारदा स्टिंग ऑपरेशन : सीबीआयने केली पहिली अटक; आयपीएस अधिकाऱ्याला केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 7:46 PM
या स्टिंग ऑपरेशनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनमध्ये एका कथित उद्योजकाला फायदा मिळवण्याच्या हेतूने तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आयपीएस अधिकारी पैसे घेताना दाखवण्यात आलं होतं. विशेष सीबीआय कोर्टात हजर करण्यात आलं असून कोर्टाने ३० सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.