ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांना एका व्यक्तीकडून धमकीचा फोन आला, त्या व्यक्तीने त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करण्याविरुद्ध धमकावले आहे. नवाब मलिक म्हणाले की, धमकीच्या कॉल आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला.मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याने नंतरच्या कुटुंबालाही लक्ष्य केले होते. त्यांनी प्रश्न विचारला होता की, "कोविड -१९ महामारी दरम्यान, संपूर्ण चित्रपट इंडस्ट्री मालदीवमध्ये होती. अधिकारी [समीर वानखेडे] आणि त्याचे कुटुंब मालदीव आणि दुबईमध्ये काय करत होते?"नवाब मलिक यांनी आरोप केला की, "ठराविक लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दुबई आणि मालदीवमध्ये 'वसुली' (खंडणी) करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, त्याचे फोटो देखील आहेत. या आरोपांना उत्तर देताना एनसीबीच्या मुंबई युनिटचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडून त्यांच्या कुटुंबावर शाब्दिक हल्ला होत आहे आणि ते या प्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबतील."मंत्री चुकीच्या गोष्टी बोलत आहेत. ते पूर्णपणे खोटे आहे. मी सुट्टीसाठी माझ्या मुलांसह मालदीवला गेलो होतो. त्यासाठी मी सक्षम प्राधिकरणाकडून योग्य परवानगी घेतली. मी कोणालाही भेटलो नाही. या प्रकारच्या आरोपांचे अधिक स्पष्टीकरण द्यायचे आहे. डिसेंबरमध्ये मी मुंबईत होतो, त्यावेळी मलिक सांगतात मी दुबईत होतो. याची चौकशी केली जाऊ शकते, "समीर वानखेडे म्हणाले.नवाब मलिक यांनी NCB किंवा समीर वानखेडे यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. मुंबईतील क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी वानखेडेवर आरोप केले होते. नवाब मलिक यांनी दावा केला होता की, समुद्र किनाऱ्यावरील क्रूझ जहाजातून प्रतिबंधित अमली पदार्थांची जप्ती "बनावट" होती आणि अटक फक्त व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे करण्यात आली होती.मात्र, समीर वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सर्व काही कायदेशीररित्या केले असल्याचे सांगितले. त्यानंतर NCB ने एक निवेदन प्रसिद्ध केले होते की समीर वानखेडे संदर्भात काही चुकीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली गेली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अनेक लोक क्रूझ ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.
नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 3:04 PM
Nawab Malik says he received threat call :हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला.
ठळक मुद्दे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याने नंतरच्या कुटुंबालाही लक्ष्य केले होते