नवाब मलिकांची तातडीने सुटका नाहीच, ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी हायकोर्टाने दिली मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 03:58 PM2022-03-02T15:58:44+5:302022-03-02T15:59:28+5:30
Nawab Malik Petition Adjourns : आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
मुंबई - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या आर्थिक गैरव्यवहाराची तपास करणाऱ्या ईडीने राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यावरही पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी व विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली असून उच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. तसेच ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करत, मलिक यांनी आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र मलिकांची तातडीने सुटका होणार नाही आहे. नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही आहे. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने हायकोर्टाकडे वेळ मागितला होता. आता नवाब मलिकांच्या याचिकेवर हायकोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक प्रकरण : हायकोर्टाने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलत ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली pic.twitter.com/vu8jYdVnh8
— Lokmat (@lokmat) March 2, 2022