दंतेवाडा: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक भयानक घटना घडवून आणली. गुरुवारी नक्षलवाद्यांनी लँडमाइनचा स्फोट केला. यात एका बोलेरो कारचा चुरा. या घटनेत 11 जण जखमी झाले तर 1 व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. दंतेवाडाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितल्यानुसार, मालेवाही पोलिस हद्दितील घोटिया गावाजवळ नक्षलवाद्यांनी लँडमाइनचा स्फोट घडवून आणला. यात धान सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी बोलेरो गाडीतून काहीजण मध्यप्रदेशच्या बालाघाटवरुन तेलंगाणाकडे जात होते. सकाळी अंदाजे 7 वाजता बोलेरो कार घोटिया गावाजवळ आली. यावेळी नलक्षलवाद्यांनी लँडमाइनचा स्फोट केला. या घटनेत बोलेरोचा अक्षरशहः चुरा झाला. यात घटनेत धान सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर 11 जण जखमी झाले.
जखमीवर उपचार सुरूदरम्यन, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अकरा जखमींपैकी पाच जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे, तर 6 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करुन नक्षलवाद्यांना शोधण्याची मोहिम सुरू केली आहे.