मुंबई - मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीने आर्यन आणि इतर आरोपींची सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने क्रूझचे सीईओ जुर्गन बेलोम (Jurgen Bailom) यांना पुन्हा समन बजावत चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझवर आणखीही काही लोक ड्रग्स घेत असल्यासंदर्भात तपास केला जात आहे. (NCB again summons cruises ceo, Aryan khan told i able to meet father by taking appointments)
न्यायालयाने आर्यन खान आणि त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमिजा शिवाय, विक्रांत चोकर, इश्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल या 5 आरोपींनाही सोमवारी 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांडवर पाठविले आहे.
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यापूर्वीच क्रूझवर माहिती देणारे लोक तैनात करण्यात आले होते. यांनीच फोटोंच्या माध्यमाने आर्यन आणि त्याच्या मित्रांच्या आगमनाची पुष्टी केली होती. आता NCB ने जहाजाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून 2 ऑक्टोबर म्हणजेच ज्या दिवशी छापा टाकला, त्या दिवशीचा जहाजाचा मेनिफेस्टो मागविला आहे. यातून जहाजावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण तपशील, रूम नंबर, त्यांच्या आय-कार्डचा तपशील आणि मोबाईल क्रमांकासह इतरही माहिती उपलब्ध होईल. जहाजाचे सर्व सीसीटीव्ही फुटेजही जहाजाच्या अधिकाऱ्यांकडून मागविण्यात आले आहेत.
आर्यन खानची चौकशी सुरू -एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशीदरम्यान सांगितले, की शाहरुख खान सध्या तीन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. तो त्याच्या पठाण चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्याला मेकअपसाठीही बराच वेळ लागतो. एवढेच नाही, तर माझे वडील एवढे व्यस्त आहेत, की त्यांची भेट घेण्यासाठी मलाही त्यांची मॅनेजर पूजा हिच्याकडून अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि नंतरच मला त्यांना भेटता येते.