नारकोटिक्स कंट्रल ब्यूरो म्हणजे एनसीबीला मोठं यश मिळालं आहे. NCB ने कारवाई करत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा याला गुरूवारी रात्री साधारण २ कोटी रूपयांच्या MD ड्रग्ससोबत अटक केली आहे.
NCB नुसार, फारूख बटाटाचा मुलगा शादाब बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्स सप्लाय करत होता. मुंबईत परदेशातून येणाऱ्या ड्रग्सचा सर्वात मोठा सप्लायर फारूख बटाटाच आहे. एकेकाळी मुंबईत बटाटे विकणार फारूख ड्रग्सचा मोठा सप्लायर कसा झाला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंध ड्रग्स कनेक्शनमध्ये अनेक ड्रग्स डीलर्स नाव समोर आलं होतं. त्यात पुन्हा एकदा फारूख बटाटा याचंही नाव समोर आलं होतं. ड्रग माफियांमद्ये सर्वात मोठं नाव फारूख शेख उर्फ बटाटा आहे. फारूख सुरूवातीच्या काळात बटाटे विकत होता. त्यावेळी तो अंडरवर्ल्डमधील काही लोकांच्या संपर्कात आला. आज तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत एडीएमएसोबतच परदेशातून येणारं ड्रग जसे की, एलएसडी, गांजा, बड, कोकेनचा सप्लाय फारूख करतो. हाय प्रोफाइल लोकांमध्ये फारूखचे चांगले संबंध आहे. मुंबईतील प्रत्येक बार आणि मोठ्या ड्रग्स पार्ट्यांमध्ये तोच ड्रग सप्लाय करतो.
फारूखला दोन मुलं आहेत. सैफ आणि शादाब हे दोन मुलेही या ड्रग्सच्या धंद्यात उतरले आहेत. ते दोघेही मोठमोठ्या महागड्या गाड्या घेऊन मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटीजना ड्रग्स सप्लाय करायला जातात. सुशांत सिंग राजूपत केसनंतर एनसीबीने मुंबईतील अनेक ड्रग माफियांची लिस्ट तयार केली ज्यांचे कनेक्शन बॉलिवूडमध्ये आहे. यात फारूख बटाटासोबतच बकुल चंदेरिया, सुवेध लोहिया यांचीही नावे आहेत.