शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

NCBने ड्रग रॅकेटचा केला पर्दाफाश, 500 कोटी रुपयांच्या हेरॉईनसह ९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 6:59 PM

NCB Busted Drug Racket : या महिलेला तिच्या सहकाऱ्यासह विमानतळावर अटक करण्यात आली.

बंगळुरू : केम्पेगौडा विमानतळ येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने परदेशातून आलेल्या महिलांकडून तब्बल 500 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी 8 विदेशी महिला आणि अन्य एक अशा 9 जणांना अटक केली आहे. या रॅकेटच्या मुंबई, दिल्ली व पंजाब कनेक्शनचा तपास सुरू आहे. एका पॅन इंडिया ड्रग सिंडिकेटचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने पर्दाफाश केला, ज्यामध्ये त्यांनी आठ परदेशी महिला आणि एका हँडलरला अटक केली आणि 500 ​​कोटी रुपयांचे 69 किलो हेरॉईन जप्त केले.

एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरू शाखेच्या अधिकाऱ्यांनी झिम्बाब्वेहून येणाऱ्या एका महिला प्रवाशाकडून 7 किलो हेरॉईन जप्त केले. हेरॉईन तिच्या सुटकेसच्या तळाशी लपवून ठेवले होते. ती महिला २४ मे रोजी झिम्बाब्वेहून केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरू विमानतळावर पोहोचली. या महिलेला तिच्या सहकाऱ्यासह विमानतळावर अटक करण्यात आली. “दोन्ही महिलांची कसून चौकशी करण्यात आली, त्यादरम्यान त्यांनी उघड केले की, ते राहत असलेल्या लॉजमध्ये एक समान बॅग ठेवली होती आणि लगेच खोलीची झडती घेतली असता त्याच प्रकारची बॅग आणि 6.890 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले,” एनसीबीने सांगितले. नंतर तपासात असे समोर आले की, समान मालासह आणखी तीन महिला प्रवासी राजधानी एक्स्प्रेसमध्ये चढले आणि बेंगळुरूहून दिल्लीला निघाले. एनसीबीने तांत्रिक गुप्तचरांच्या आधारे काम केले आणि ते मध्य प्रदेशातील इटारसीजवळ खाली उतरल्याचे आढळले. "परिणामी, इंदूर विभागीय पथकाने अशाच तीन ट्रॉली बॅगमधून 21 किलो हेरॉईन जप्त केले आणि एका लॉजमधून तीन महिलांना अटक केली," असे अधिकाऱ्याने सांगितले. एनसीबीला तपासात पुढे कळले की या महिलांचा हँडलर बंगळुरू येथील आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थBengaluruबेंगळूरAirportविमानतळNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश