एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनीबॉलीवूडवर केलेल्या कडक कारवाई दरम्यान मुंबई गाठली आहे. रविवारी अस्थाना मुंबईत पोहोचले असून त्यांनी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि याप्रकरणी संपूर्ण माहिती घेतली. विशेष गोष्ट म्हणजे राकेश अस्थाना यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. वकील विकास सिंह यांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की, एनसीबीचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून तपास भरकटत आहे. सीबीआय या प्रकरणावर शांत बसली आहे. जगभरात करोडो चाहते असलेल्या बॉलिवूडसाठी शनिवारचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरला. आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा खान आणि श्रद्धा कपूर यांची ड्रग्ज सेवनाबद्दल जवळपास साडे पाच तास स्वतंत्रपणे कसून चौकशी करण्यात आली होती. तिघीनीं ड्रग्जबाबत अप्रत्यक्ष संपर्क आल्याची कबुली दिली असली त्याचे सेवनाचा ठामपणे इन्कार केला होता. दरम्यान एनसीबीने तिघींचेही मोबाईल जप्त केल्याची माहिती मिळत आहे. तिघींनी अनेक प्रश्नांवर असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्यांना क्लिनचिट देण्यात आलेली नाही.मात्र त्यांना तूर्तास तातडीने पुन्हा चौकशीसाठी बोलाविले जाणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दीपिकाने तिची मॅनेजर करिष्मा प्रकाशसमवेतचा ड्रगचॅट मान्य केला मात्र आपण पार्टीत ड्रग घेतले नसल्याचे सांगितले. तर सारा व श्रद्धा यांनी अनुक्रमे केदारनाथ व छीच्छोरे चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत ड्रग्ज घेत होता, आपण मात्र त्यापासून अलिप्त होतो अशी कबुली दिली. श्रद्धाने सीबीडी ऑइल सेवनासाठी नाही तर अंग दुखत असल्याने मागविले होते, असा जबाब दिला असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले होते. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी जया साहा हिने दिलेल्या माहितीतून आघाडीच्या अभिनेत्रीची नावे पुढे आल्याने बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एनसीबीने तिघींना समन्स बजाविल्यानंतर तिघींनी शनिवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली होती. त्यानंतर दुसऱ्यादिवशी NCB प्रमुखांनी मुंबई गाठली आणि मुंबई, दिल्ली झोन तपास अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर कारवाईचा फास आवळणार की मोठी कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक
बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ
महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन
कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक