शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

NCB पंचनामा : Aryan Khan ने घेतलं होतं चरस; Arbaaz Merchant नं बुटातून काढलं पॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2021 2:46 PM

Cruise Drugs Case : अरबाजने कबूल केले की, तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि क्रूझवर धमाल करण्याच्या मार्गावर होते.

ठळक मुद्देमुंबईच्या खोल समुद्रात २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला होता. या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत.

मुंबई ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व आरोपींची रवानगी सध्या आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानने ड्रग्स घेतलं होतं की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान हा चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट हा ६ ग्रॅम चरस आपल्या बुटात लपवून क्रुझवर घेऊन जात होता असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. 

मुंबईच्या खोल समुद्रात २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीने छापा टाकला होता. या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाचे धागेदोरे हळूहळू उलगडत आहेत. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अरबाज मर्चंटला विचारणा केली असता, अरबाज मर्चंटने स्वतः त्याच्या शूजमधून चरस असलेले झिप लॉक पाउच काढले. अरबाजने कबूल केले की, तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि क्रूझवर धमाल करण्याच्या मार्गावर होते. जेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारले, तेव्हा त्याने कबूल केले की, तो चरस घेतो आणि हे चरस क्रूझ ट्रिपमध्ये ओढण्यासाठी घेतले होते.  क्रुझ ड्रग्स प्रकरणातील छापेमारीवेळी एनसीबीने केलेल्या पंचनाम्यात हे नमूद करण्यात आलं आहे.

पंचनामा म्हणजे काय? पंचनामा ही एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे तपास यंत्रणा गुन्हेगारीच्या ठिकाणाहून प्राथमिक नोंदी आणि पुरावे गोळा करते. या दरम्यान, पोलीस किंवा तपास यंत्रणा साक्षीदारांचे जबाब नोंदवतात. पंचनामा तयार करताना पोलीस काही नागरिकांना घेतात जेणेकरून ते तपास यंत्रणेच्या कारवाईचे प्रत्यक्षदर्शी बनू शकतील.एनसीबीच्या पंचनाम्यात दोन पंचाचा उल्लेख आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर रोघोजी सेन. या पंचनामाच्या पान क्रमांक ६ मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा उल्लेख आहे.पंचनाम्यानुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंटने पहिल्यांदा एनसीबी अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना विचारल्यावर त्यांची नावे दिली. मग एनसीबीच्या अधिकाऱ्यानेही त्याला चौकशीचे कारण सांगितले.यानंतर आशिष रंजन प्रसाद यांनी दोन्ही तरुणांना एनडीपीएस कायदा 1985 च्या कलम 50 मधील तरतुदी समजावून सांगितल्या. एनसीबीने आर्यन आणि अरबाजला पर्याय देखील दिला की, जर त्यांची झडती  राजपत्रित अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांसमोर करायचा असेल तर ते होऊ शकते, परंतु दोघांनीही विनंती नाकारली. यानंतर झडतीची प्रक्रिया सुरू झाली. पंचनाम्यानुसार, तपास अधिकाऱ्याने दोघांना विचारले की, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना दोघांनी त्यांच्यासोबत बंदी घातलेले ड्रग्ज असल्याचे कबुल केले एनसीबीच्या पंचनाम्यात म्हटले आहे की, अरबाज मर्चंटने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, त्याच्या शूजमध्ये चरस आहे. यानंतर अरबाजने स्वेच्छेने त्याच्या शूजमध्ये ठेवलेले झिप लॉक पाउच काढले. या झिप लॉकच्या आत एक काळा चिकट पदार्थ होता. जेव्हा डीडी किटसह त्याची चाचणी घेण्यात आली, तेव्हा हे पदार्थ चरस असल्याचे निश्चित झाले.पंचनाम्यानुसार, अरबाजने कबूल केले की, तो आर्यन शाहरुख खानसोबत चरस घेतो आणि ते या क्रूझ ट्रिपमध्ये मज्जामस्ती करणार होते. पंचनाम्यात लिहिले आहे की, यानंतर, जेव्हा आर्यन खानला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने कबूल केले की, तो चरस देखील ओढतो आणि हे चरस क्रूझवर प्रवास करताना ओढण्यासाठी वापरणार होते. या चरसचे वजन 6 ग्रॅम होते.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोShahrukh Khanशाहरुख खानArrestअटकDrugsअमली पदार्थ