नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) माहीममधील फ्लॅटवर छापा टाकला आणि १५ लाख रुपयांची एमडी (१३६ ग्रॅम) ड्रग्स जप्त केले आहे. एनसीबीने घटनास्थळावरून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तिघांची चौकशी सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात एनसीबीच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा माहीममधील फ्लॅटवर छापा टाकला. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम जवळचा आणि गँगस्टर करीमलालाचा नातेवाईक परवेझ खान उर्फ चिंकू पठाण याच्या महत्वाच्या ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. घटनास्थळावरून ताब्यात घेतलेल्या तीन ड्रग पेडलर्सकडून एनसीबीची टीम वास्तविक अमली पदार्थ तस्करांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. अद्याप यासंदर्भात एनसीबीने अधिकृत माहिती दिली नाही.
NCB च्या जाळ्यात अडकला सर्वात मोठा मासा, 'Pablo of drug word' नावाने प्रसिद्ध
दाऊदच्या हस्तकाचे भिवंडीत सापडले कनेक्शन, ड्रग्स रॅकेटप्रकरणी सराफासह एकाला अटक
मुंबईत चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबीने अमली पदार्थ तस्कररांविरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत एनसीबीकडून ड्रग प्रकरणात फिल्म अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यासह 25 नामांकित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि डझनभर नामांकित व्यक्तींची चौकशी केली आहे. गेल्या आठवड्यात एनसीबीने दाऊद इब्राहिमचे खास परवेझ खान ऊर्फ चिंकू पठाण आणि आरिफ भुजवाला यांना अटक केली होती. चिंकू पठाणच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने माहीम येथे छापा टाकला आणि इतर अमली पदार्थ तस्करांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.