शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आर्यनप्रकरणी एनसीबी आरोपपत्र दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 10:22 AM

एनसीबीने गेल्या वर्षी क्रूझवर छापेमारी करत आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह काहींना ताब्यात घेतले होते.

मुंबई :  कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाने वाढवून दिलेला ६० दिवसांचा अवधी या महिन्यात संपत आहे. त्यामुळे एनसीबी एक ते दोन दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे समजते.

एनसीबीने गेल्या वर्षी क्रूझवर छापेमारी करत आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह काहींना ताब्यात घेतले होते. एनसीबीने आर्यन खान याला गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला अटक केली होती. आर्यनला २८ ऑक्टोबरला जामीन मिळाला होता. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या कटाचा भाग असल्याचे सिद्ध करण्यासारखे कोणतेही पुरावे न सापडलेले नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता.  एनसीबीला याप्रकरणात २ एप्रिलपर्यंत हे आरोपपत्र दाखल करायचे होते. मात्र, एनसीबीच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप झाल्यामुळे  तपास रखडला. एनसीबीच्या मुंबई विभागाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांची बदली झाली. त्यामुळे याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या विशेष समितीने मार्चच्या अखेरीस मुंबई सत्र न्यायालयात अर्ज करून आरोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र न्यायालयाने एनसीबीला ६० दिवसांची मुदत दिली आहे. एनसीबीच्या आरोपपत्रातून काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानCrime Newsगुन्हेगारीNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो