शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

NCB ची सर्वात मोठी कारवाई; कोट्यवधी रुपयांचे LSD ड्रग जप्त, मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 15:22 IST

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने 14,961 LSD ब्लॉट्ससह 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

LSD Seizure: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीला मोठे यश मिळाले आहे. एनसीबीने दिल्ली-एनसीआरसह राजस्थानमधील जयपूर येथून एलएसडीची मोठी खेप जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधांची किंमत करोडो रुपये आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील एलएसडीची ही सर्वात मोठी खेप असल्याचे सांगितले जात आहे. एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, गामागोबलिन आणि होली स्पिरिट ऑफ असुरचे 14,961 ब्लॉट्स अर्थात स्टॅम्प जप्त केले आहेत.

एलएसडीचे व्यावसायिक प्रमाण 6 ब्लॉट्स म्हणजेच सुमारे 0.1 ग्रॅम आहे, परंतु जप्त केलेला माल यापेक्षा 2,500 पट जास्त आहे. एलएसडी हे आजकाल भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या ड्रग्जपैकी एक आहे, ज्याचे तरुण मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांमध्ये सेवन करतात. असे मानले जाते की हे औषध घेतल्यानंतर वेगवेगळे आवाज आणि रंग दिसतात. यामुळेच आजकालची तरुणाई या ड्रग्जचे सर्वाधिक सेवन करत आहे, पण जर त्याचे प्रमाण जास्त झाले तर ते घातक ठरू शकते.

LSD सिंडिकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटकएनसीबीच्या दिल्ली झोनने देशभरातील सिंडिकेटचा भंडाफोड केला आहे. हे सिंडिकेट एलएसडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी डार्कनेट, सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सी, कुरिअर आणि इंडिया पोस्टचा वापर करत होते. या सिंडिकेटशी संबंधित 6 जणांना दिल्ली, ग्रेटर नोएडा आणि जयपूरमधून अटक करण्यात आली आहे. एका महिलेचाही यात समावेश आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, या सिंडिकेटचा सर्वात मोठा सप्लायर आणि मास्टरमाइंड जयपूरचा रहिवासी आहे.

NCB ने छाप्यात 15000 LSD ब्लॉट जप्त केलेया छाप्यात एनसीबीने सुमारे 15 हजार एलएसडी ब्लॉट अर्थात स्टॅम्प जप्त केले आहेत. या पेपर ब्लॉटमध्ये एलएसडी द्रवपदार्थाच्या स्वरूपात पेस्ट केला जातो. एलएसडीचे हे ब्लॉट्स अमेरिका, नेदरलंड, पोलंड यांसारख्या देशांतून पोस्ट किंवा कुरिअरद्वारे या सिंडिकेटपर्यंत पोहोचत होते. या सिंडिकेटकडून आतापर्यंत एकूण 14,961 एलएसडी ब्लॉट्स आणि 2.232 किलो गांजासह 4.65 लाख रुपये जप्त करण्यात आले असून ड्रग मनी असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली