शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा वीज अभियंत्यावर हल्ला; दाम्पत्यावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 9:35 PM

Attack on Engineer : या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

ठळक मुद्देसहायक अभियंता ममता हेमके या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी नरेश ठाकूर यांच्या निवासस्थानी गेल्या.

यवतमाळ :  ऑगस्ट २०१९ पासून थकीत असलेल्या वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहायक वीज अभियंत्यावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नरसिंग राजपूत उर्फ नरेश ठाकूर व त्यांच्या पत्नीने हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारी ४.३० वाजता आर्णी मार्गावरील वैद्यनगरमध्ये घडली. या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 सहायक अभियंता ममता हेमके या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी नरेश ठाकूर यांच्या निवासस्थानी गेल्या. ठाकूर यांच्याकडे ४३ हजार ९०० रुपयाचे वीज बिल थकीत आहे. ते वसूल करण्यासाठी कारवाई करण्यात आली. या दरम्यान, ठाकूर व त्यांच्या पत्नी यांनी ममता हेमके यांच्यावर हल्ला केला. धक्काबुक्की करीत त्यांना हुसकावून लावले. या प्रकरणामुळे वीज पथक ठाकूर यांच्या घरुन परत आले. त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकरणाची तक्रार दिली. ममता हेमके यांच्या तक्रारीवरून नरसिंग राजपूत उर्फ नरेश ठाकूर व गायत्री राजपूत यांच्या विरोधात भादंवि ३५३, ३३२, १८९ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राजकीय पुढाऱ्यांकडेही वीज बिलाची मोठी रक्कम थकीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळPoliceपोलिसelectricityवीजNCPराष्ट्रवादी काँग्रेस