मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह सापडले आहेत. शाजापूर हौसिंग बोर्ड कॉलनीतील दीनदयाळ नगरमधील घर गेल्या तीन दिवसांपासून बंद होते. तीन दिवसांनंतर शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली, त्यांना काहीतरी अनुचित प्रकार असल्याचा संशय आला. शेजाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. या प्रकरणाची माहिती मिळताच लालघाटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी घर उघडून पाहिले असता तेथे आई आणि मुलाचे मृतदेह पडले होते.मिळालेल्या माहितीनुसार, संतोषबाई यांचे पती ललित सुरा यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी हौसिंग बोर्ड कॉलनीतील दीनदयाळ नगरमध्ये जगदीश गोस्वामी यांचे घर विकत घेतले होते. संतोष बाई (70) या घरात अर्धांगवायू झालेला मुलगा धर्मेंद्र (50) याच्यासोबत राहत होत्या. हे घर गेल्या तीन-चार दिवसांपासून बंद असून त्यातून दुर्गंधी येत असल्याची माहिती रहिवाशांनी शनिवारी सकाळी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच लालघाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी खिडकीतून डोकावले असता महिलेचा मृतदेह तेथे पडलेला होता. यावर पोलिसांनी दरवाजा तोडला.
मला तुझ्यासोबत राहायचं नाही! पतीने मोबाईल देण्यास दिला नकार, पत्नी प्यायली पेपरमिंटचे तेल
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्नपोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली. त्यांनी घराची झडती घेतली असता मुलाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला. चौकशीत दूधवाल्याने पोलिसांना सांगितले की, तो तीन दिवसांपासून दररोज दूध देण्यासाठी येतो, मात्र कोणीही दरवाजा उघडत नाही. पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता या घरात आई आणि मुलगा राहत असल्याचे समोर आले. आई वृद्ध होती आणि मुलाला अर्धांगवायू झाला होता.
थरकाप उडवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून तरुणीची भरदिवसा तिच्या घराबाहेर गळा चिरून हत्यालालघाटी पोलिस स्टेशनचे प्रभारी केके चौबे म्हणाले की, घरात हत्येबाबत कोणतेही पुरावे सापडले नाहीत किंवा जबरदस्तीने प्रवेश केल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रथमदर्शनी दोन्ही मृत्यू अपमृत्यु वाटतात. मुलगा बाथरूममध्ये गेला असावा आणि तेथे पडल्याने त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून या धक्क्यात महिलेचाही बेडवरच मृत्यू झाला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.