शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नेपाळी पोलिसांची भारतीय लोकांना मारहाण; तणावानंतर बॉर्डरवर SSB जवान तैनात, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 9:46 PM

Nepal police beat indian citizens : वादानंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे. 

ठळक मुद्देहा मार्ग तस्करांसाठी सोपा आहे आणि या छोट्या मार्गाद्वारे सीमेपलिकडे हालचाल सुरू आहे.

अररिया - पुन्हा एकदा नेपाळ आणि बिहारच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती उद्भवली आहे. फारबिसगंज उपविभागाच्या जोगबनीजवळ नेपाळ सीमेवर भारतीय आणि नेपाळी पोलिसांमध्ये वादावादी आणि दगडफेक झाली. वादानंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार जोगबनीतील इस्लामपूर मशिदी चौकातील खुल्या सीमेवरुन सतत हालचाल सुरू आहेत. यावरूनच सोमवारी जेव्हा सीमावर्ती भागात अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला, तेव्हा नेपाळी पोलिस आणि इस्लामपूरमधील लोकांमध्ये गदारोळ झाला आणि नेपाळी पोलिसांनी लाठीमार केला. यावर स्थानिक लोकांनी नेपाळी पोलिसांवर दगडफेक केली.अजूनही सीमेवर तणाव!हा मार्ग तस्करांसाठी सोपा आहे आणि या छोट्या मार्गाद्वारे सीमेपलिकडे हालचाल सुरू आहे. नेपाळमधील सीमेवर कडकपणा आणि लॉकडाऊन असूनही लोक सीमा ओलांडत कसे आहेत? यावर प्रश्न उपस्थित होत आहे. ही माहिती मिळताच फरबिसगंजचे डीएसपी रामपुकार सिंह घटनास्थळी गेले आणि आता त्यांनी प्रकरण शांत केले आहे. वातावरण अजूनही तणावपूर्ण आहे.नेपाळमध्ये लॉकडाउन लागू आहेअसे सांगितले जात आहे की, नेपाळमध्येही संपूर्ण लॉकडाउन आहे, त्यामुळे तेथील सुरक्षा कर्मचारी लोकांना हटकत होते. त्याचवेळी नो मेन्स लँडच्या शेजारी असलेल्या नेपाळच्या साईटवर चहा पिण्यासाठी गेलेल्या काही लोकांचा नेपाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला.एसएसबीने हे सांगितलेफरबिसगंजचे एसडीओ सुरेंद्रकुमार अलबेला यांनी सांगितले की, काही लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा लोकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळी तळ ठोकून बसलेल्या एसएसबीच्या 56 व्या बटालियनचे एसआय दिनेश प्रसाद यांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर दोन्ही देशांमधील वाहतूक ठप्प झाली आहे आणि कोणालाही नो मेंस लँडमध्ये जाण्यास परवानगी नाही.

टॅग्स :BorderसीमारेषाNepalनेपाळIndiaभारतPoliceपोलिस