'तो' क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 12:25 PM2021-11-07T12:25:57+5:302021-11-07T12:33:06+5:30

Crime News : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मामाकडे आलेल्या भाच्याची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

nephew came to celebrate diwali at maternal uncle house brother of four sisters died on day of bhai dooj | 'तो' क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला 

'तो' क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला 

googlenewsNext

नवी दिल्ली - ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मामाकडे आलेल्या भाच्याची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एक क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भाऊबीजेच्याच दिवशी 4 बहिणींनी एकुलता एक भाऊ गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून मामा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

तरुण दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मामाकडे आला होता. त्याच दरम्यान त्याच्या मामाचा गावातील काही लोकांसोबत वाद सुरू होता. याच दरम्यान त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांना याप्रकरणी दहा जणांना ताब्यात घेतलं आहे. खरगोनच्या उमरखली येथे मामा पप्पू वर्मा याच्याकडे त्याचा भाचा राजा वर्मा आला होता. गाडी लावण्यावरून पप्पू वर्माचा गावातील काही लोकांशी छोटा वाद झाला. यानंतर वर्मा यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रागाच्या भरात हल्ला करण्यात आला. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

राजा हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ 

संतापलेल्या लोकांनी पप्पू वर्माच्या घरावर हल्ला केला आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी राजा देखील या भांडणात पडला. पुढे या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. यामध्ये दोघांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण राजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजा हा चार बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. भाऊबीजेच्याच दिवशी त्याचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: nephew came to celebrate diwali at maternal uncle house brother of four sisters died on day of bhai dooj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.