उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) लखीमुपूर खीरीमध्ये हत्येची एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका भाच्याने मामाची हत्या केली. कारण भाच्याच्या घरात तयार केलेलं चिकन टेस्टी नसल्याचं म्हणाला. आधी यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर दोघांनी एकमेकांना मारहाण सुरू केली आणि मग भाच्याने मामाची हत्या (Nefhew killed Uncle) केली.
ही घटना लंदनपुरा गावातील आहे. शुक्रवारी रात्री भाचा मंगलदीपने त्याच गावात राहणाऱ आपला मामा छोटेलाल याला चिकन आणि दारूच्या पार्टीला आपल्या घरी बोलवलं होतं. आधी दोघांनी दारू ढोसली आणि नंतर चिकनवर ताव मारू लागले. (हे पण वाचा : पाण्याच्या ड्रममध्ये अर्धनग्न अवस्थेत बहिणीचा मृत्यू, भाऊ म्हणाला - आत्महत्या नाही हा तर मर्डर आहे साहेब!)
या दरम्यान मामाने भाच्याला विचारलं की, चिकन तू बनवलं का? अजिबात टेस्टी नाही. यावरून मामा-भाच्यात वाद पेटला. वाद सुरू असतानाच मामा छोटेलालने भाच्याला एक छापड मारली. यामुळे संतापलेला भाचा मंगलदीपने घरात शेताच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शस्त्राने मामावर जोरदार वार केला.
हल्ल्यानंतर काही लोक कसेबसे मामाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र, जास्त रक्त वाहून गेल्याने मामा छोटेलालचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. याची माहिती जेव्हा गावात मिळाली तर एकच खळबळ उडाली. गावातील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नंतर भाचा मंगलदीप याला अटक केली. (हे पण वाचा : खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला)
पोलीस अधिक्षक विजय ढुल म्हणाले की, दोन्ही मामा-भाचे सारख्या वयाचे होते. दोघेही मित्रासारखे वागत होते. ज्यामुळे भाचा मंगलदीपने मामा छोटेलाल याला पार्टीसाठी घरी बोलवलं. यादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. भाच्याने रागाच्या भरात आणि नशेत असताना मामावर हल्ला केला. मामा गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
छोटेलालचा नातेवाईक बाबू याने सांगितलं की, जेवणाआधी दोघे दारू प्यायले. नंतर जेवणाता चिकनवरून काहीतरी वाद झाला. ज्यानंतर भाच्याने मामाची हत्या केली.