मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक व्यक्ती पोलीस स्टेशनच्या चकरा मारत आहे. मात्र पोलीस ऐकत नसल्याचं म्हटलं आहे. गोल पहाडीया येथील जनकपुरी येथे राहणाऱ्या संतोष प्रजापतीची पत्नी लग्नाच्या अवघ्या १७ दिवसांतच पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोषला आता त्याच्या पत्नीच्या कारनाम्याची माहिती मिळाली. पत्नीने फेसबुक मेसेंजरद्वारे संतोषला सत्य सांगताच तो हादरला आहे.
लग्नात मिळालेले दागिने आणि घरात ठेवलेली रोख रक्कम घेऊन पत्नी फरार झाल्याचा आरोप संतोषने केला आहे. घरातून पळून जाण्याचं कारण म्हणजे दुसरं लग्न. ही बाब संतोषला उशीरा कळली. लग्नापर्यंत तो सर्व काही ठीक आहे असे गृहीत धरत होता, पण नंतर त्याच्या बायकोचं सत्य समोर येऊ लागलं. एके दिवशी तो घरी परतला आणि त्याला समजलं की त्याची पत्नी घरातून बेपत्ता आहे.
परिसरात चौकशी केली असता अंजली तिच्या माहेरी गेल्याचं सांगण्यात आलं. त्याला वाटलं की बायकोला माहेरची आठवण येत असेल म्हणून ती निघून गेली. पण बरेच दिवस झाले आणि अंजली परत आली नाही. एके दिवशी कपाट उघडलं तेव्हा त्याला धक्काच बसला. कपाटातून चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि लग्नात दिलेली २५ हजारांची रोकड गायब होती. त्यामुळे संतोषला आपली फसवणूक झाल्याचं समजलं.
पत्नीने फेसबुक मेसेंजरद्वारे सांगितलं की तिने हे दुसरं लग्न केलं आहे. तिने पहिल्या लग्नाचे फोटो पाठवले. संतोषने पोलिसांना सांगितलं की, पत्नीने तीन महिने आधी आर्य समाज मंदिरात बॉयफ्रेंडशी लग्न केलं होतं. या घटनेबाबत एएसपी गजेंद्र वर्धमान सांगतात की, आमच्याकडे तक्रार आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल.