- अरुण वाघमोडेअहमदनगर - सुंदर तरुणी संपर्कात आली तर बहुतांश पुरुषांचे मन विचलित होते. याच मानसिकतेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणुकीचा नवीनच फंडा शोधून काढला आहे. तरुणींच्या व्हाॅट्सअॅप व्हिडीओ कॉलमध्ये अडकून नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक कॉलेज तरुण, व्यावसायिक व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या तीन ते चार तक्रारी आठवड्यातून सध्या येथील सायबर पोलिसांत दाखल होत आहेत. सुंदर फोटो असलेली तरुणी प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात येते. चॅटिंगच्या माध्यमातून ती मैत्री वाढविते. त्यानंतर ती तरुणी व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करते.व्हिडीओ कॉल सुरू असतो तेव्हा ती तरुणी स्क्रीनवर संपूर्ण शरीर दाखवून स्वत:चे कपडे उतरविते. यावेळी समोरील व्यक्तीलाही तसेच करायला सांगते. याच वेळी समोरील तरुणी व तिचे साथीदार स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नग्न झालेल्या तरुणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतात. त्यानंतर त्या व्यक्तीकडे पैशांची मागणी केली जाते. अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.फसवणूक करणाऱ्या टोळ्या परप्रांतीयव्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या या झारखंड, नोयडा, मध्य प्रदेश या परिसरातील असल्याची सायबर पोलिसांची माहिती आहे. अशा फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही. अशी येते ‘ती’ तरुणी संपर्कातसायबर गुन्हेगारांच्या टोळ्या फसवणुकीसाठी सोशल मीडियावर टार्गेटचा शोध घेतात. प्रथम फेसबुकवरून अकाउंटधारकाला अनोळखी तरुणीची फ्रेण्डरिक्वेस्ट येते. ही रिक्वेस्ट स्वीकारली की, ती मेसेंजरच्या माध्यमातून संपर्कात येते. कधी चॅटिंग तर कधी मेसेंजरच्या माध्यमातून कॉल असा सिलसिला सुरू होतो. नंतर ती व्हाॅट्सअॅप नंबर मागते. त्यानंतर व्हाॅट्सअॅपवरून कॉल करून अडकविले जाते.फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये. प्रत्येकाने आपले फेसबुक अकाउंट प्रायव्हेट करावे. अनोळखी व्यक्तीने संपर्क केला तर त्याला आपली कुठल्याच प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये.- प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस ठाणे, अहमदनगर
सायबर गुन्ह्यांचा नवा फंडा : हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचे रॅकेट, तरुण, डॉक्टर ठरले बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 6:11 AM