नवी दिल्ली : दिल्लीत मोठी चोरीची घटना घडली आहे. पहाडगंज परिसरात चोरट्यांनी दोन कोटींचे दागिने लंपास केले आहेत. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरट्यांनी ही घटना घडवली आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दिल्ली पोलिसांची अनेक पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत दोन कोटी रुपयांचे दागिने लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दरोड्याची ही घटना बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील पहाडगंज परिसरात सुमारे २ कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट झाल्याची घटना समोर आली आहे. डोळ्यात मिरची पावडर टाकून चोरट्यांनी ही घटना घडवली.
कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. दिल्ली पोलिसांची अनेक पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी पहाटे 4:49 वाजता पीएस पहाडगंज येथे पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये म्हटले आहे की, पहाडगंजमध्ये एक दरोडा पडला, ज्यामध्ये दोन लोकांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून 2 कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट केली.
महिला ड्रग्ज तस्कराला अटकदुसरीकडे, दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील अँटी नार्कोटिक्स सेलने एका महिला ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. रशिदा बेगम असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून 49 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त ईशा पांडे यांनी सांगितले की, रविवारी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, निजाम नगर बस्तीजवळ एक महिला अज्ञात व्यक्तीला ड्रग्ज विकण्यासाठी येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला तात्काळ पकडले आणि झडती घेतली असता 49 ग्रॅम हेरॉईन सापडले. आरोपी रशिदा ही हजरत निजामुद्दीन परिसरातील रहिवासी आहे.