लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे अल्पवयीन मुलाने आईची हत्या केल्याचं उघड झाले होते. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. महिलेच्या हत्येवर तिसऱ्या व्यक्तीची क्षणोक्षणी नजर होती. हत्येनंतर आरोपी मुलगा रात्री २ वाजता स्कूटी घेऊन त्या व्यक्तीला भेटायला गेला होता. ज्याचं लक्ष या हत्याकांडाकडे होते.
याचा खुलासा हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आरोपीची बहिणीने केला आहे. आईच्या हत्येनंतर रात्री उशीरा २ च्या सुमारास मुलगा स्कूटी घेऊन कुणालातरी भेटायला गेला होता आणि त्या व्यक्तीला घटनेची माहिती दिली. भैय्या, रात्री २ वाजता मला खोलीत बंद करून कुणालातरी भेटायला गेले होते असं बहिणीनं पोलीस तपासात सांगितले. नातेवाईकांनुसार, आईविरुद्ध मुलाच्या मनात खूप द्वेष भरला होता. प्रत्येकवेळी वडील मुलाला सपोर्ट करत होते. मुलगा चुकीचा वागल्यानंतर आई त्याला ओरडत होती. परंतु वडील त्याला पाठिंबा द्यायचे. षडयंत्रानुसार मुलाला या प्रकरणात पुढे आणले गेले आणि द्वेषामध्ये त्याने हे कृत्य केले.
तसेच आईच्या हत्याकांडामागे कुणाचा डाव होता. हे लवकरच समोर येईल असं नातेवाईक म्हणाले तर आरोपी मुलाच्या चौकशीनंतर उत्तर प्रदेश बालहक्क आयोगानं म्हटलं की, मुलाला विचारल्या प्रश्नांच्या उत्तरानंतर तो आईला मारू शकतो असा संशय येतो. परंतु बालहक्क आयोगाच्या सदस्य सूचिता यांच्या मते, मुलाचा आईप्रती प्रेम होते तो कधी आईला मारू शकत नाही. मुलगा भांडू शकतो. नाराज होऊन घरातून जाऊ शकतो. परंतु परदेशी पिस्तुलीने गोळी झाडली त्याचं कारण स्पष्ट होत नाही. त्यामुळे या प्रकरणात तिसरा व्यक्ती सहभागी आहे का असाही संशय येतो.
रिसर्च टीम घेणार शोधबालहक्क आयोगाची रिसर्च टीम या मुलाच्या प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यात २ सायकोलॉजिस्ट, २ वकील, २ डॉक्टर आणि २ बालहक्क आयोगाचे सदस्य या प्रकरणी रिसर्च करणार आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकरणात आम्ही रिसर्च टीमला कामाला लावले आहे. कारण हे प्रकरण खूप गुंतागुतीचे आहे. त्याचा सर्व बाजूने चोख तपास व्हायला हवा असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.