पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala Murder) हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) केल्या जात असलेल्या स्पेशल सेलमधील चौकशीतून रोज नवीन खुलासे होत आहेत. स्पेशल सेलच्या चौकशीतून समोर आलं की, लॉरेन्स बिश्नोईला सिद्धू मूसेवालावर दबाव बनवायचा होता. लॉरेन्स आणि गोल्डी बरारची इच्छा होती की, मूसेवालाने त्यांच्यासाठी गाणं गायला हवं.
अनेकदा लॉरेन्सच्या गुडांनी सिद्धू मूसेवाला याला धमकीही दिली होती. त्यामुळेच सिद्धू मूसेवाला दविंदर बंबीहा गॅंगच्या संपर्कात आला होता. लॉरेन्सचा भाऊ अनमोलही चौकशीच्या जाळ्यात असेल. पण तो सध्या ऑस्ट्रियामध्ये आहे.
चौकशी करणाऱ्या एजन्सीकडे लॉरेन्स बिश्नोई कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे इनपूट आहे. त्यामुळे रिमांड आणि चौकशी दरम्यान त्याला मोठ्या सुरक्षेत ठेवलं जात आहे. एजन्सीला माहिती मिळाली की, जर त्याला जामीन मिळाला तर तो परदेशात पळून जाऊ शकतो.
असंही दिसलं आहे की, लॉरेन्स बिश्नोई आजपर्यंत कोणत्याही हत्येमध्ये थेटपणे सहभागी नव्हता. तो केवळ त्याच्या नेटवर्कचा वापर करून खंडणी आणि हत्येचं प्लानिंग व षडयंत्र करणे यात सहभागी राहतो. एका गॅंगचं काम दुसऱ्या गॅंगकडून करून घेतो आणि दुसऱ्याचं काम तिसऱ्या गॅंगकडून.
तिहार तुरूंगात बसून लॉरेन्स बिश्नोई त्याची गॅंग अशी काही चालवतो, जशी तो बाहेर येऊनही चालवू शकला नसता. सूत्रांनुसार, या गॅंगमध्ये साधारण 700 शूटर्स आहेत, जे लॉरेन्सच्या एका इशाऱ्यावर कोणतंही काम करायला तयार होतात.
हे सगळे शूटर्स दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पसरले आहेत. या गॅंगचा हवालातील पैसा ब्रिटन आणि दुबईमध्येही अनेक ठिकाणी लावला आहे. ज्याची माहिती एजन्सीला मिळाली आहे.