शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

५३ दिवसांपूर्वी लग्न करून सासरी आली मुलगी; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:28 IST

३० जानेवारी सकाळी ७.३० वाजता मला मुलीच्या सासरच्यांकडून फोन आला नेहाची तब्येत खूप खराब आहे असं सांगितले

छपरा - मागील ८ डिसेंबरला विवाह करून सासरी आलेल्या नवविवाहितेने तिच्या खोलीत पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमोर्टमसाठी पाठवला. छपराच्या मुफस्सिल परिसरातील ही घटना आहे. कुलदीप नगरमध्ये राहणाऱ्या हेमंत कुमार उर्फ राजचं लग्न ८ डिसेंबर २०२२ रोजी नेहा कुमारीसोबत झाले होते. नेहाच्या अचानक मृत्यूनं सगळ्यांना धक्का बसला. 

गेल्या सोमवारी सकाळी सासरच्या लोकांनी नेहाच्या घरच्यांना कॉल केला आणि तुमच्या मुलीची तब्येत ठीक नाही असं सांगितले. मात्र त्यानंतर नेहाने गळफास घेत आत्महत्या केल्याचं म्हटलं. नेहा संजय सिंह यांची मुलगी होती. मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच सिंह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नाला काहीच दिवस झाले असताना मुलीने हे टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न नेहाच्या कुटुंबियांना पडला होता. मृत महिलेच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर सासरचे लोक मुलीला मोबाईलवर कमी बोलायला देत होते. 

या प्रकरणी पोलीस अधिकारी मुनेश्वर प्रसाद सिंह म्हणाले की, एका नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. मृत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की, माझ्या मुलीचा नवरा आणि तिचा सासरा नवीन व्यवसाय सुरू करणार होते. त्यासाठी त्यांना ५ लाख रुपये हवे होते. त्याच कारणाने सासरच्यांनी त्यांच्या मुलीला मारून त्याला आत्महत्येचं रुप दिले असा आरोप त्यांनी केला. 

तक्रारीत वडिलांनी काय आरोप केलाय? मी माझी मुलगी नेहा कुमारीचं लग्न ८ डिसेंबरला हेमंतकुमारसोबत केले होते. विवाहानंतर ९ डिसेंबरला प्रथेनुसार मुलीची पाठवणी करण्यात आली. मी जेव्हा कधीही मुलीला भेटण्यासाठी तिच्या सासरी यायचो तेव्हा मला भेटून दिले जात नव्हते. ती पतीसह कधी मामाच्या घरी, कधी आत्याच्या घरी गेलीय असं सांगायचे. मी माझ्या मुलीशी फोनवरून बोलायचो तेव्हा तिच्या बोलण्यावरून तिच्यावर कुणाचा तरी दबाव असून ती मनातलं काही सांगू शकत नाही असं वाटायचं. नेहानं तिच्या सासरचे ५ लाख रुपये मागतायेत असं सांगितले होते. 

३० जानेवारी सकाळी ७.३० वाजता मला मुलीच्या सासरच्यांकडून फोन आला नेहाची तब्येत खूप खराब आहे असं सांगितले. मी आणखी विचारलं तेव्हा तिने गळफास घेतल्याचं मला कळवले. जी मृत अवस्थेत होती. मी सकाळी ९.३० वाजता घरी पोहचलो तेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता आणि तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. मला तिच्या सासरच्यांवर संशय आहे त्यांनी मुलीची हत्या करून त्याला आत्महत्येचं रुप दिले आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करावी असं मृत महिलेच्या वडिलांनी तक्रारीत सांगितले आहे.