Haryana Crime News : एका नवविवाहितेच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं अशात तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. कुटुंबियांनी आरो लावला की, विवाहितेवर सासऱ्यांची वाईट नजर होती आणि तो तिच्यासोबत अश्लील वागत होता. विवाहितेने विरोध केला तर सासरच्या लोकांनी तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.
हरयाणामध्ये महिलांप्रति वाढत असलेले अत्याचार थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. ताजी घटना आहे पलवल-अलीगढच्या राठोड कॉलनीतील. जिथे छेडछाडचा विरोध केल्यावर नवविवाहितेवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. यादरम्यान महिलेच्या पतीच्या हातालाही गोळी लागली. ज्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस अधिकारी रामचंद्र जाखडनुसार, उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील चौकडा गावच्या डूंगर सिंहने पोलिसात दिेलेल्या तक्रारीनुसार, साधारण एक महिन्याआधी ७ फेब्रुवारीला त्यांनी त्यांची १९ वर्षीय मुलगी रजनीचं लग्न ग्रीटिंग नौहवारसोबत लावून दिलं होतं. ग्रीटिंग सध्या आपल्या परिवारासोबत अलीगढमध्ये राहतो.
सूनेवर सासऱ्याची वाईट नजर
लग्न झाल्यापासूनच रजनीचा सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. तो पुन्हा पुन्हा रजनीला त्याचे पाय चेपण्यास सांगत होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत अश्लील चाळे करत होता. रजनीने हे तिच्या पतीला आणि सासूला सांगितलं. त्यांनीही तिची साथ दिली नाही. उलट तिलाच गप्प राहण्यास सांगितलं. रजनीला अनेकदा माहेर जाण्याचं बोलत होती, पण तिला माहेरी जाऊ दिलं गेलं नाही.
अखेर तिला संपवलं
शुक्रवारी रजनीचा पती, सासरा आणि सासूने तिची गोळी झाडून हत्या केली. कुटुंबियांना रजनीचा मृतदेह जिल्ह्या नागरिक हॉस्पिटलमध्ये सापडला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी रजनीचा पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात तक्रार दिली. महिलेच्या पतीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.