मुंबई - बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन एनसीबीकडून चौकशी सुरू असल्याने एनसीबीच्या कार्यालयासमोर मीडिया कव्हरेजसाठी पत्रकारांची गर्दी असते. आज सकाळी पत्रकारांमध्येच जुंपली. पत्रकारांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे वेळीच हा वाद निवळला.एनसीबी कार्यालयासमोर कव्हरेज करताना एका न्यूज चॅनेलचा पत्रकार दररोज आरडाओरडा करून कव्हरेज करत असत. त्यामुळे इतर न्यूज चॅनेलच्या पत्रकारांना लाईव्ह आणि कव्हरेज करताना अनेकदा अडचणी आल्या. त्यातच आज कव्हरेज सुरू असताना एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराने मुंबईकर पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार असे हिनवले, त्यामुळे मुंबईकर पत्रकार संतापले आणि दिल्लीहून आलेल्या एका न्यूज चॅनेलच्या आरडाओरडा करणाऱ्या पत्रकाराला धक्काबुक्की केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याच्या प्रयत्न केला.
ड्रग्स प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिमॉन खंबाटाची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरू आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच सर्व पत्रकार एनसीबी कार्यालयासमोर जमले होते. यावेळी पत्रकारांना बातमी कव्हर करण्यासाठी देण्यात आलेल्या जागेवर उभं राहण्यावरून दोन पत्रकारांमध्ये वाद झाला. शिवाय एका चॅनेलचा पत्रकार तर आरडाओरडा करत बातमी कव्हर करत होता. त्याने इतरांना कव्हरेज करताना व्यत्यय येत होता. त्यामुळे या पत्रकारांनी आरडाओरड करून कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने इतर पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे पत्रकार म्हणून हिणवले. त्यामुळे संतापलेल्या पत्रकारांनी या पत्रकाराला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केल्याने एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वादाचे चित्र उभे राहिले, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. या वादाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल
अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध
धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया