देशविरोधी कारवाया करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी संघटनांविरोधात एनआयएला आज मोठे यश मिळाले आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली आहे.
कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया याला एनआयएने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केल्याचे, अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले. 2019 पासून फरार असलेला कुलविंदरजीत अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये आणि पंजाबमध्ये अनेक लोकांच्या हत्याप्रकरणात हवा होता. त्याच्या नावावर ५ लाखांचा इनामही ठेवण्यात आला होता.
खानपुरिया हा १८ नोव्हेंबरला बँकॉकहून दिल्लीला आला होता. यावेळी सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी खानपुरियाला ताब्यात घेतले.