शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

‘इसिस’विरोधात एनआयएची छापेमारी; महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये १३ ठिकाणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 7:23 AM

एका संघटनेच्या घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळून लावल्याचा दावा बिहार पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याप्रकरणी  तीन जणांना अटक केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये १३ ठिकाणी रविवारी छापे टाकले. महाराष्ट्रात नांदेड व कोल्हापूर जिल्ह्यांत एनआयएने कारवाई केली. या ठिकाणांहून एनआयएने अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या. उत्तर प्रदेशमधील देवबंद येथून मदरशातील एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

एका संघटनेच्या घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळून लावल्याचा दावा बिहार पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याप्रकरणी  तीन जणांना अटक केली होती. त्यातील काही आरोपी पाटण्यातील फुलवारी शरीफ भागातील रहिवासी आहेत. या सर्व घडामोडींबाबत एनआयएने २५ जूनला गुन्हा दाखल केला होता. फुलवारी शरीफ येथून मिळालेल्या माहितीनंतर तीन दिवसांपूर्वी एनआयएने बिहारमधील पाटणा, दरभंगा, मोतीहारी, नालंदा, अररिया, मधुबनी येथे छापे टाकले होते. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनआयएने रविवारी मध्य प्रदेशातील भोपाळ, रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी, अहमदाबाद जिल्हे; बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ, तुमकूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेड जिल्हा, उत्तर प्रदेशमधील देवबंद येथे छापे टाकले. गुजरातमध्ये एनआयए तिघा जणांची चौकशी करीत आहे. देशात घातपाती कारवाया करण्याचा इसिस संघटनेचा डाव असून, तिच्याशी काही लोक संलग्न आहेत. 

नांदेड, कोल्हापूरमध्ये चौकशीएनआयएने नांदेडमध्ये देगलूर नाका परिसरातील पहाटे चार वाजता तिघांना ताब्यात घेतले होते. त्यात एका धर्मगुरूचा समावेश आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे एका घरावर छापा टाकून तिथे पाच तास झडती घेतली. सख्खे भाऊ असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सहा तास चौकशी केली. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. ज्या दोन भावांची चौकशी केली, ते लब्बैक इमदाद फाउंडेशन ही संस्था चालवितात. संतप्त जमावाने रविवारी सायंकाळी या संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करीत साहित्य रस्त्यावर फेकून दिले.

ताब्यात घेतलेला आयएसआयच्या संपर्कात?उत्तर प्रदेशातील देवबंद येथे मदरशातील एका विद्यार्थ्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. फारुक असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो कर्नाटकचा मूळ रहिवासी आहे. त्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. फारुकला अनेक भाषा येतात व तो पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी एका सोशल मीडिया ॲपद्वारे संपर्कात होता असे समजते. याआधी २३ जूनला मुजिबुल्ला या रोहिंग्या जमातीतील विद्यार्थ्याला देवबंदमधून अटक करण्यात आली होती.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाISISइसिस