शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

एनआयएचा नेरुळसह पनवेलमध्ये छापा; पीएफआयच्या कार्यालयाची झाडाझडती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 8:19 PM

पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दहशतवादांना रसद पुरवल्याच्या संशयातून एनआयएकडून देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापे टाकले जात आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी नेरुळमधील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. सुमारे आठ तासाच्या झाडाझडती नंतर अधिक तपासासाठी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. तर पनवेलमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केरळ मध्ये टाकलेल्या छाप्यानंतर महाराष्ट्रातील देखील पीएफआयच्या कार्यालयांवर गुरुवारी पहाटे छापे टाकले. त्यात नेरुळ सेक्टर २३ मधील कार्यालयावर देखील एनआयएचे पथक धडकले. नेरूळच्या पीएफआयची जबाबदारी सांभाळणाऱ्या आसिफ शेख यांना पहाटे ४ च्या सुमारास घरातून ताब्यात घेऊन कार्यालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी पहाटे ५ ते दुपारी १ पर्यंत कागदपत्रांची झाडाझडती सुरु होती. त्यानंतर मोठया प्रमाणात कागदपत्रे सोबत घेऊन एनआयएच्या पथकाने दुपारी दिड वाजता तिथून पाय काढला.

ठिकाणावरून कोणास ताब्यात घेण्यात आलेले नाही. तर आपण संस्थेच्या माध्यमातून कोणताही गैर प्रकार केलेला नसल्याचे आसिफ शेख यांचे म्हणणे आहे. तर पथकाला चौकशीत सहकार्य केले असून, कार्यालयातून प्रचार पत्रके, बॅनर व इतर कागदपत्रे नेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईसाठी असलेल्या पोलीस सुरक्षेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 

मात्र पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही. 

मोदीं विरोधी भूमिकेने अडचण ?

पीएफआयच्या नेरुळ येथील कार्यालयात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महागाई विरोधातल्या आंदोलनातले पोस्टर आढळून आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कमी करा अथवा, खुर्ची सोडा असे संदेश लिहिलेले आहेत. त्याशिवाय इतरही आंदोलन व सामाजिक उपक्रमाचे पोस्टर कार्यालयात आढळून आले आहेत. 

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा