नालासोपारा : पूर्वेतील परिसरात राहणाऱ्या एका नायजेरियनने इमारतीच्या घरात बसून तेलंगणा राज्यातील नागरिकांची फसवणूक करून लाखो रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी नायजेरियनला सायबर क्राइमच्या पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक करून तेलंगणा राज्यात नेले.नायजेरियन लोकांच्या गँगसुद्धा नालासोपारा शहरात कार्यरत असून हे फसवणूक, लॉटरीचे प्रलाेभन, अमली पदार्थ विक्री असे गैरधंदे करत आहेत. अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीमध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पूर्वेतील अग्रवाल नगरीतील एका इमारतीत राहणाऱ्या डेव्हिड नामक नायजेरियन नागरिकावर तेलंगणा राज्यातील नागरिकांना २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होता. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांची सायबर टीम सोमवारी नालासोपाऱ्यात दाखल झाली होती. त्यांनी डेव्हिड याला सोमवारी संध्याकाळी अटक करून त्याची तुळिंज पोलीस ठाण्यात रीतसर नोंद करून तेलंगणा राज्यात नेले आहे.
पोलिसांकडून नायजेरियन जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 6:35 AM