आग्राच्या महिला पोलीस ठाण्यात एका महिलेने हुंड्यासाठी छळ, मारहाण, फसवणूक आणि इतर कलमांबद्दल आपल्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमध्ये पत्नी हनिमूनला गेली तेव्हा नवऱ्याचं पितळ उघडं पडलं आणि पतीने स्वत: समलिंगी असल्याचे आणि गंभीर आजाराने ग्रासलेला असल्याचे त्याने सांगितलं आहे. एवढेच नाही तर त्याने तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला त्रास दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत.कोतवाली भागात राहणाऱ्या या मुलीने सांगितले की, तिचे लग्न अलीगढ़ रोड, हाथरस निवासी येथील रहिवासी असलेल्या युवकाशी मे 2019 रोजी झाले होते. तो तरुण डॉक्टर आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार, तिने लग्नात 30 लाख रुपये खर्च केले होते. सासरचे लोकसुद्धा या गोष्टीवर खुश नव्हते. लग्नानंतर ते तिला टोमणे मारायचे. दोन दिवसांनंतर पती कुल्लू मनालीला हनीमूनला घेऊन गेला. येथे रिसॉर्टमध्ये थांबलो.महिलेने हे आरोप केलेहॉटेलमध्ये नवऱ्याने तिला मारहाण केली असा महिलेचा आरोप आहे. चालत असताना डोंगरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वाचली. हॉटेलमध्ये आल्यानंतरही धमकी दिली. यादरम्यान, दरम्यान, नवरा म्हणाला की, तो समलैंगिक आहे. याला विरोध केल्याबद्दल मारहाण केली. मोबाइल तोडला आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याची सुटका केली. माहिती मिळाल्यानंतर मनाली पोलिस घटनास्थळी आले.पोलिसांनी पतीशीही चर्चा केली. त्यावेळी हे प्रकरण शांत झाले. यानंतर हे दोघेही हनिमूनहून परत आले. तिचा सासरा आल्यानंतर ती मुलगी आपल्या मायदेशी गेली. ऑगस्ट 2019 मध्ये सासरच्यांनी घरी येऊन दहा लाख रुपयांची मागणी केली. पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात या प्रकरणाची सुनावणी झाली. तथापि, करार झाला नाही.पीडित महिलेने 11 सप्टेंबर रोजी पतीविरूद्ध महिला पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. यात तिने तिच्या पतीवर फसवणूक, हुंड्यासाठी त्रास, मारहाण, अत्याचार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. विचारविनिमयानंतर कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हनीमूनच्या रात्री डॉक्टर पतीचं झालं पितळ उघडं, पत्नीने बोलावलं पोलिसांना मग...
By पूनम अपराज | Published: October 02, 2020 3:28 PM
Crime News : एवढेच नाही तर त्याने तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला त्रास दिला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिस तपास करत आहेत.
ठळक मुद्देकोतवाली भागात राहणाऱ्या या मुलीने सांगितले की, तिचे लग्न अलीगढ़ रोड, हाथरस निवासी येथील रहिवासी असलेल्या युवकाशी मे 2019 रोजी झाले होते. तो तरुण डॉक्टर आहे.