अंबाला - बल्लभगढ, फरीदाबाद येथे ठार झालेल्या विद्यार्थिनीच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येवरून राज्याचे गृहमंत्री अनिल विज खूप संतप्त आहेत. या प्रकरणात विज यांनी मंगळवारी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी एसआयटीलाही लव्ह जिहादच्या अँगलने या हत्येची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता 2018 मध्ये निकिताच्या अपहरण प्रकरणाचीही चौकशी केली जाईल. अनिल विज म्हणाले की, आरोपींचे नातेवाईक हे काँग्रेसशी संबंधित आहेत आणि त्यांना भीती आहे की, 2018 मध्ये काँग्रेसनी दबाव आणून अपहरणाची तक्रार मागे घेतली. विज यांनी सांगितले की, आपण राज्यातील मुलींना असं मारू देणार नाही.निकिताच्या आईने सरकारकडे अशी मागणी केली आहे की, पोलिसांनी मुलीची हत्या केली त्याच प्रकारे पोलिसांनी आरोपींचे एन्काउंटर केले जावे. त्याचबरोबर त्या म्हणतात की, जर कोणी २० वर्षे मुलीला पालनपोषण करून वाढवून तिचा जीव घेईल तर कोण कशाला मुलीला वाढवेल असे वाटते. मुलगी झाल्यावर लोक मारतील. मृतकची आई वारंवार आरोपींना एन्काउंटर करून मारण्याची मागणी करीत आहे, अशी माहिती न्यूज १८ हिंदीने दिली आहे. हे प्रकरण आहेफरीदाबाद शहरातील एका कॉलेज युवतीची कॉलेजच्या गेटबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी मुख्य आरोपी तौशीफसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. मृत विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती, सोमवारी सायंकाळी 4 वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ही घटना घडली.
थरार सीसीटीव्हीत कैद! अपहरणाचा डाव फसल्याने तरुणीची कॉलेजबाहेर गोळ्या घालून हत्या
तौशीफने यापूर्वीही केले होते अपहरणउत्तर प्रदेशच्या हापूल येथील मूळ रहिवाशी असलेल्या निकिता तोमरचे कुटुंबीय फरीदाबाद येथे शिफ्ट झाले होते. याप्रकरणी मुलीचे वडिल मूलचंद तोमर यांनी सांगितले की, तौशीफ नावाचा मुस्लीम कुटुंबातील मुलगा 12 वी पर्यंत निकीतासोबतच शिक्षण घेत होता. यावेळी, निकीतासोबत मैत्री करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केला असून तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन 2018 साली निकाताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले होते. निकीता ही हुशार विद्यार्थीनी होती. शाळेत 95 टक्के गुण मिळवल्यानंतर, एअर फोर्समध्ये करिअर करण्याची तिची इच्छा होती. मात्र, तौशीफने एकतर्फी प्रेमातून तिची हत्या केली.