पुणे - जनता वसाहत येथील नीलेश वाडकर खून प्रकरणातील टोळीप्रमुख सुनील ऊर्फ चॉकलेट किशोर डोकेफोडे (वय २२, रा. घोरपडे पेठ) याच्यासह १९ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आलेला आहे.चॉकलेट, नवनाथ बाळासाहेब वाल्हेकर, योगेश राजेंद्र जांभळे, अभिजित गणेश कडू, नितीन ऊर्फ मेट्या अंकुश मेटकरी, अतिष सतीश माळी, प्रकाश ऊर्फ पप्पू अरुण गायकवाड, सौरव रावसाहेब आढाव, राजेश रावसाहेब आढाव, अक्षय हरिभाऊ आंबवले, सूरज ऊर्फ सुरज्या बबन कोळगे, अभिजित राम कदम, भीमराज राजू कांबळे, समीर राऊत नाटेकर, अविनाश ऊर्फ गौरव सुनील देवकुळे, शुभम एकनाथ खाडे, सतीश शाम माळी, योगेश ऊर्फ नुन्या शशिकांत पवार आणि दीपक शेंडी ऊर्फ दीपक दत्तात्रय खिरीड अशी मोक्का लावलेल्यांची नावे आहेत.जनता वसाहतीत वर्चस्ववादातून चॉकलेट सुन्या व त्याच्या साथीदारांनी नीलेश वाडकर याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता़ तर, अमोल कदम, गणेश जाधव आणि सुजित बंडवे यांना गंभीर जखमी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता़ या सर्वांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात खून व खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे़टोळीप्रमुख चॉकलेट सुन्या आणि साथीदार दहशत, हिंसाचाराचा अवलंब, करून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून मारामारी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे यासारखे गुन्हे करतात.दत्तवाडी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केला़ अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली़
नीलेश वाडकर खून प्रकरण : टोळीप्रमुख चॉकलेट सुन्यासह १९ जणांवर मोक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 2:02 AM