शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

Nirav Modi Extradition: भारतात नीरव मोदीला भोगावा लागणार तुरूंगवास, पण तरीही मिळणार 'या' खास सोयी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 8:36 PM

पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारताबाहेर पळून गेला होता.

Nirav Modi Extradition, India: पंजाब नॅशनल बँक प्रकरणातील फरारी नीरव मोदी भारतात येऊ शकणार का? हा अजूनही प्रश्न आहे. लंडन हायकोर्टाने नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. मात्र, त्याचा भारतात येण्याचा मार्ग अद्याप पूर्णपणे मोकळा झालेला नाही. कारण, त्याला सुप्रीम कोर्टात आणि नंतर मानवाधिकार कोर्टात जाण्याचा मार्ग अजूनही शिल्लक आहे. लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेब्रुवारी २०२१ मध्ये नीरव मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. याला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले, तेथे त्यांचे अपील फेटाळण्यात आले. पण जरी भारतात त्याला कारागृहात राहावे लागले तरीही त्याला काही विशेष सेवा मिळणार असल्याची माहिती आहे.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेची (PNB) १४ हजार ५०० कोटी रुपयांची फसवणूक केली. नीरव मोदीवर ६ हजार ८०५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीएनबी घोटाळा उघडकीस येण्यापूर्वीच नीरव मोदी जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळून गेला होता. नीरव मोदीने भारतात न येण्यासाठी अनेक क्लृक्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वकिलांनी सांगितले की, तो मानसिक आजाराने त्रस्त आहे आणि भारतात आल्यावर आत्महत्येचा धोकाही आहे. पण, नीरव मोदीला कोणताही मानसिक आजार नाही किंवा त्याने आत्महत्येचा किंवा स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्नही केलेला नाही, असे या तज्ज्ञांचे मत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्यार्पणानंतर नीरव मोदीला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल, जे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तेथे सतत त्याच्यावर लक्ष ठेवले जाईल, जेणेकरून त्याचा आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा धोकाही कमी होईल.

आर्थर रोड जेल किती खास आहे?

- आर्थर रोड जेल ब्रिटिशांनी १९२५ मध्ये बांधले होते. १८४२ ते १८४६ या काळात बॉम्बेचे (आताचे मुंबई) गव्हर्नर सर जॉर्ज आर्थर यांच्या नावावरून या तुरुंगाचे नाव ठेवण्यात आले.- १९७० मध्ये या रस्त्याचे नाव बदलून साने गुरुजी मार्ग असे करण्यात आले. १९९४ मध्ये या कारागृहाचे नाव बदलून मुंबई सेंट्रल जेल असे करण्यात आले. तरीही ते आर्थर रोड जेल म्हणून ओळखले जाते.- आर्थर रोड जेल २.८३ एकरमध्ये पसरले आहे. यात एकावेळी ८०० कैदी बसू शकतात. मात्र काही वेळा कैद्यांची संख्या दोन ते तीन हजारांपर्यंत पोहोचते.- या तुरुंगात दहशतवादी अजमल कसाब, अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, २००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी छोटा राजन यांच्यासह अनेक हायप्रोफाईल कैदी ठेवण्यात आले आहेत.- विजय मल्ल्याला भारतात आणल्यास त्यालाही बॅरेक क्रमांक-12 मध्ये ठेवण्यात येईल, असे सरकारने लंडनमधील न्यायालयाला सांगितले होते. मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

नीरव मोदीला कोणत्या सुविधा मिळणार?

- इतर कैद्यांप्रमाणेच नीरव मोदीला चटई, उशी, चादर आणि ब्लँकेट देण्यात येणार आहे. त्याला दररोज शुद्ध पिण्याचे पाणी, चोवीस तास वैद्यकीय सुविधा, शौचालय आणि कपडे धुण्याची सुविधाही मिळेल.- या कक्षात पुरेशी प्रकाश आणि हवा खेळती असल्याची सुविधा असेल, असे आश्वासन कारागृह विभागाने दिले आहे. मोदीला सामान ठेवण्यासाठी एक कपाटही देण्यात येणार आहे.- नीरव मोदीला दररोज व्यायाम किंवा इतर कामासाठी सेलमधून बाहेर पडण्याची परवानगी असेल. मात्र, त्याला एका दिवसात एका तासापेक्षा जास्त वेळ बाहेर राहता येणार नाही.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाEnglandइंग्लंड