नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेशची शेवटची याचिका सुनावण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. दोषी मुकेश कुमार सिंह याने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
मुकेशने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे की, त्याची याचिका लवकरच सुनावणीसाठी घेतली जावी. यावर सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरलेल्या मुकेशच्या वकिलांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यासमोर याचिका सुनावणीसाठी पाठवण्यास सांगितले. निर्भया प्रकरणात दोषी मुकेशच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याला फाशी द्यायची असेल तर यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही.
Nirbhaya Case : दोषी पवन अल्पवयीन असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला
शनिवारी दाखल केली याचिका निर्भया प्रकरणात फाशी होऊ नये म्हणून दोषींकडून रोज नवीन युक्ता लढविल्या जात आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिका फेटाळल्यानंतर आता दोषी ठरलेला मुकेश सिंहने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देत न्यायालयीन आढावा घेण्याची मागणी केली. ग्रोवर म्हणाल्या की, ही याचिका घटनेच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत देण्यात आली आहे. तसेच शत्रुघ्न चौहान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे.